महावितरणाचा गलथान कारभार डिपीली चिटकून म्हैस दगावली ,वाढोणा येथील घटना. 

सेनगाव तालुक्यातील वाढोणा येथील महावितरणाच्या गलथान कारभारामुळे शेतकर्यांची म्हैस दगावली यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे

 गावानजीक उघडे असलेल्या डीपीला विज प्रवाह उतरला होता उघड्या डीपीला तारा उघडे असल्यामुळे येथीलशेतकऱ्याच्या म्हैशीचा स्पर्श झाला आणि त्यात म्हैस दगावले हि म्हैस अंदाजे 80 हजार रुपये असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे 

सध्या पावसाळा सुरू आहे चार दिवसापासून सतत जोरदार पाऊस पडत आहे त्यामुळे विद्युत थांबा मध्ये करंट उतरण्याचे प्रकार सातत्याने घडत आहे 

उघड्या असलेल्या डिपीला दूरूस्ती व लाल कंपाऊंड करण्याची महावितरणाला वारंवार मागणी करून सुध्दा महावितरणाने गांभीर्याने घेत नसल्यामुळे ही घटना घडली वेळीच दखल घेतली असती तर आज ही घटना घडली नसती असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे 

अंदाजे 80 हजार रुपये किंमतीची म्हैस दगावल्याने संतोष पांडे यांचे मोठे नुकसान झाले आहे शेतकरी पांडे यांची अर्थीक परिस्थिती हालाखीची आहे म्हैस पालन करून ते कूटूंबाची उपजीविका चालवत होते नेहमीप्रमाणे शेतातून म्हैस ते घरी आणत असतांना हा धक्कादायक प्रकार घडला आसून

या घटनेत संतोष पांडे शेतकरी यांच्या वर संकट कोसळले व तसेच दोषी असलेल्या महावितरण कर्मचारीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे घटनास्थळी विज वितरण अधिकारी दाखल झाले असून पंचणामा प्रक्रिया सुरू आहे