अल्पसंख्याक सेल च्या तालुका कार्यध्यक्ष पदी वाजीद अली तर शहराध्यक्ष पदी सय्यद अन्सार यांची नियुक्ति}

धर्माबाद:_

राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्यालय धर्माबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक सेल चे जिल्हाध्यक्ष डॉ. मुजाहेद खान व जिल्हा सरचिणीस ॲड.विलायत अली काझी यांच्या प्रमुख उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेल च्या तालुका कार्यध्यक्ष पदी वाजीद अली आबेद अली यांची तर शहराध्यक्ष पदी तरुण ,तडफदार कार्यकर्ता सय्यद अन्सार यांची नियुक्ती करण्यात आली.तसेच धर्माबाद शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष जावेद सर यांच्या नेतृत्व वर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मान्यवरांचा उपस्थितीत पक्ष प्रवेश केला,यावेळी माजी नगर सेवक प्रतिनिधी आबेद अली,सुधाकर जाधव, तालुका कार्यध्यक्ष हणमंत पाटील कीरोळे, शहाराध्यक्ष जावेद सर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष मोहसीन खान,पक्षाचे सक्रिय कार्यकरते काशीफ हुसैन, सय्यद बाबर,रेहान कुरेशी, मुजम्मील हुसैन,पत्रकार मिसाळे सर,रज्जाक सर ,भगवान कांबळे सहीत असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते..