औरंगाबाद : पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वस्तुनिष्ठ पंचनामे करुन तात्काळ मदत मिळवून देण्याचे निर्देश कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज आढावा बैठकीत जिल्हा प्रशासनाला दिले.सिल्लोड, सोयगाव तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा व कृषी विभागाच्या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले याच्या सह सिंचन व पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी उर्वरित तालुक्यातील गावनिहाय नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश महसूल विभागाला कृषिमंत्र्यांनी दिले. तसेच फर्दापूर गावातील तसेच वाड्या वस्तीतील पाणीपुरवठा सूरळीत होण्यासाठी जल जीवन मिशन व जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने प्रयत्न करावेत. तसेच पाणी पुरवठ्यासाठी लागणारी वीज जोडणी तसेच वॉटर ग्रीडच्या कामाच्या निविदा लवकर पूर्ण कराव्यात. खेळणा पाणी प्रकल्पाचे काम, निझामकालीन बंधाऱ्याची दुरुस्ती आणि झकास पुष्प पठार विकासासाठी जिल्हा नियोजन विकास निधीत तरतूद करण्याचे निर्देश देखील यावेळी कृषिमंत्र्यांनी संबधित विभागाला दिले.