चारठाणा(प्रतिनीधी)औरंगाबादहून नांदेडकडे जाणार्‍या एका ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक पलटी होऊन चालक जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.११) सकाळी चारच्या सुमारास गणेशपूर पाटीजवळ घडली. 

Sponsored

देव क्लासेज व मून रेस्टॉरेंट - बूंदी

देव क्लासेज व मून रेस्टॉरेंट की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |

या बाबत अधिक माहिती अशी की, ट्रक (क्रमांक ए.पी.१६ टि.ई. ६४४७) हा औरंगाबादवरून नांदेडकडे जात असताना गणेशपूर पाटीजवळ ट्रक येताच चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक रोडच्या खाली जावून पलटी झाला.

या अपघातात चालक वैनू गोपाल श्रीकांत (वय ३० वर्ष रा.विजयवाडा) हा जखमी झाला. जखमी चालकास गणेशपूर येथील काही मंडळींनी चारठाणा येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल करून उपचार करून घेतले.