कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील

              कोरेगाव भीमा, तालुका शिरूर येथील किसनराव भिकोबा फडतरे यांच्या पत्नी व जुन्या पिढीच्या मातोश्री सौ. शेवंताबाई किसनराव फडतरे वय 85 वर्षे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. कोरेगाव भीमा विविध विकास कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन , सनराईज इंग्लिश मीडियम स्कूल कोरेगाव भीमाचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक संजय किसनराव फडतरे यांच्या त्या मातोश्री होत्या.

              कोरेगाव भीमा, शिरूर तालुक्यात तसे गावात समाजसेवेत तसेच राजकीय वर्तुळात छाप असणारे फडतरे कुटुंब या जुन्या पिढीच्या मातोश्रीच्या जाण्याने फडतरे भाऊकी, गाव तसेच आप्तेष्ट नातेवाईक यांच्यावर दुःख कोसळले आहे. त्यांचे पाठीमागे पती, चार मुलगे, दोन मुली, नातवंडे पतवंडे असा परिवार आहे.