"रशियात होणाऱ्या साहित्य सम्राट आण्णा भाऊ साठे अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण देशाचे पंतप्रधान व आण्णा भाऊ साठे कुटुंबातील व्यक्तीच्या हस्ते व्हावे"
..................................................
"मार्गारिटा रुडो मिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर मास्को रशिया" या संस्थेतर्फे जगविख्यात साहित्यिक सत्यशोधक आण्णा भाऊ साठे यांचा सातासमुद्रापार बलाढ्य देश आण्णा भाऊंचा सन्मान करतोय हा फक्त मातंग समाजालाच नाही तर संपूर्ण देशाला याचा अभिमान आहे.आण्णा भाऊंचे अनुयायी जाम खुश आहेत कारण त्यांना आण्णा भाऊंचां असा सन्मान या भूमीत झाला नाही पण परकीय देशात होतोय याचा आनंद व्यक्त करणे साहजिक आहे.
मला व अनेकांना असा प्रश्न पडतोय येवढ्या भल्या मोठा देश आण्णा भाऊंचा सन्मान करतोय तर राज्यातील साधा उपमुख्यमंत्री उपस्थित राहून तो आण्णा भाऊंचां सन्मान नाही तर अपमान होतोय.आण्णा भाऊंचां सन्मानाला अशी माणसं जात आहेत की ज्या राज्यात आण्णा भाऊंचा जन्म झाला त्याच भूमीत आण्णा भाऊंना उपेक्षित ठेवलं.जातीच्या चष्म्यातून पाहिलं गेलं. आण्णा भाऊंच्या जन्मभूमी गावात पूर्णकृती पुतळा सुद्धा उभारू न शकलेले जातीयवादाने बरबटलेले राज्यकर्ते आज रशियाला जायला उतावीळ झाले आहेत.एखाद्या देशाने एखाद्या देशाच्या महापुरुषांचा सन्मान करत असेल तर त्या देशाचे प्रमुख व्यक्तींनी उपस्थित राहायला पाहिजे.तेव्हाच त्या देशालाही आपल्या देशाचा सन्मान करताना आनंद होतो.रशिया देशाला ही आण्णा भाऊंच कुटुंब त्यांचे वारस जिवंत आहेत.त्यांची इथल्या देशात राज्यात काय सन्मान होतो कोणती परिस्थिती हे समजल पाहिजे.त्यामुळे माझी व संपूर्ण समाज बांधवांची प्रामाणिक भावना आहे आण्णा भाऊं साठे कुटुंबाच्या हस्ते हे अनावरण व्हावं या कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहून आण्णा भाऊंचा सन्मान करावा.
आम्ही कोणत्याच सरकारच या पक्षाचं समर्थन करत नाही तर या राज्यात आण्णा भाऊंचा सन्मान कोणत्याच राजकीय पक्षाने केलेला नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, बिजीपी,शिवसेना या सर्वच पक्षानी आण्णा भाऊंचां सन्मान केला नाही. सर्वच स्मारकाची घोषणा केली कोणताच स्मारक उभरलं गेलं नाही,भारतरत्न साठी राज्याने ठराव सुद्धा मंजूर केला नाही,गेली 15 वर्ष आण्णा भाऊंच्या नावाचं महामंडळ बंद पाडलं,मुंबई विद्यापीठाला आण्णा भाऊ चे नाव दिले नाही, आण्णा भाऊंची जन्मशताब्दी साजरी केली नाही इथल्या राजकीय नेत्यांना लाज वाटली नाही म्हणून माझी विनंती आहे की परकीय देश आण्णा भाऊंचा सन्मान करतोय तर यथोचित झाला पाहिजे.आण्णा भाऊंची किंमत कमी करण्याचा हा डाव चालू आहे आपण तो हाणून पाडावा. रशिया ला जाणारे स्वतचाच थाट मिरवत आहेत.या भूमीत आण्णा भाऊंचां सन्मान करा मगच रशियाच्या विमानात बसा हीच आमची प्रामाणिक भावना आहे.
#MGD जर असे मौलिक कार्य करत असेल तर त्यांनी देशाच्या पंतप्रधान ,आण्णा भाऊंच कुटुंब यांच्यासाठी आग्रह धरावा. 1) मुंबई विद्यापीठाला आण्णा भाऊ साठे यांचे नाव द्यावे 2) आण्णा भाऊ साठे जन्मभूमीत भव्य दिव्य स्मारक उभे करावे.3) आण्णा भाऊंचां भारतरत्न पुरस्कार ने सन्मानित करावे
या तीनच मागण्या साठी प्रयत्न करावे.खऱ्या अर्थाने आण्णा भाऊंचां सन्मान करूनच त्या देशात जावे.उगाच जतियवादी तोंड घेऊन जाऊ नये.हीच विनंती !
चला आण्णा भाऊ साठे यांचां यथोचित सन्मान करूयात!
🙏🙏🌹🌹✊✊
..................................................
आकाश वाडेकर सोशल मिडिया प्रसिद्धी प्रमुख
आण्णा भाऊंचां अनुयायी ...साठे कुटुंबाचा मिडिया