अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जालना जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन सादर

संदर्भ

यावर्षीपासून संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजनेचा लाभ घेणाऱ्या अपंग ज्येष्ठ नागरिक विधवा महिला यांना प्रतिवर्षी हयात प्रमाणपत्र सोबत उत्पन्न दाखला देण्याची जाचक अट घातली आहे ती रद्द करा या संदर्भातील निवेदन जालना जिल्हाधिकारी साहेब यांना सादर करण्यात आले त्याचबरोबर शासन निर्णयानुसार शासकीय कार्यालयासमोर दिव्यांग बांधवांना व्यवसाय करण्यासाठी 200

 स्क्वेअर फुट जागा उपलब्ध करून देण्यात यावी या संदर्भातील मागणी देखील या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष माननीय श्री भाऊसाहेब किसन दसपुते साहेब यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाखाली निवेदन सादर करण्यात आली

हे निवेदन सादर करताना

जालना जिल्हा अध्यक्ष माननीय श्री गणराज गावंडे महाराज

जालना जिल्हा उपाध्यक्ष

माननीय श्री शेख नूर चौधरी साहेब

जालना जिल्हा महासचिव

प्रवीण रघुनाथ ढवळे

या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या वतीने सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले सन्माननीय जालना जिल्हाधिकारी साहेब यांनी लवकरच सर्व मागण्या शासन दरबारी पोहोचवू असे ठाम आश्वासन अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांना दिले.