भामट्याला पोलिसांनी केली अटक

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

सोलापुर :- मी पोलीस आहे, पोलीस भरती करतो असे सांगून चार तरुणांकडून प्रत्येकी 60 हजार रुपयांप्रमाणे 2 लाख 40 हजार रुपये घेतलेल्या भामट्याला वळसंग पोलिसांनी अटक केली आहे. 

त्यास न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. 

पोपट रामचंद्र चौगुले राहणार भाळवणी तालुक्या मंगळवेढा असे नाव असून याने पोलीस खात्यात सेवेत नसताना पोलिसाचा गणवेश घालून तरुणांची फसवणूक केली आहे. 

पोपट चौगुले हा औज येथे काही दिवसांपूर्वी आला होता. गावातील रवी गेनसिद्ध जमादार, समर्थ अशोक भगत, आणि आकाश चंद्रकांत कोळी या तिघांना मी पोलीस आहे. तुमची पोलीस भरती करतो असे सांगून तिघांकडे प्रत्येकी 60 हजार रुपयांची यासाठी मागणी केली. तरुणांचे मित्र फिर्यादी मलकारसिद्ध रमेश जमादार असे चार जणांकडून दोन लाख 40 हजार रुपये घेतले तत्पूर्वी चौगुले याने पोलीस असल्याचे भासवण्यासाठी पोलीस वेषात तरुणांना व्हिडीओ कॉल केला होता. पोलीस असल्याने समजून विश्वासाने पैसे देऊन फसवणूक झाल्याचे समजताच वळसंग पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्या नुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले उपनिरीक्षक म्हाळप्पा सुरवसे यांनी या भामट्याला अटक केली अक्कलकोट न्यायालयात उभे केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे .