भारतरत्न इंदिरा नगर येथील श्री शरणशिवलिंगेश्वर साधु महाराजांचे अड्डपल्लकी महोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. दरवर्षी श्रावण समाप्ती निमित्त या पालखीचे आयोजन करण्यात येते.. या पालखी महोत्सवापूर्वी श्रावण महिन्यात रोज पहाटे 5.30 ते 6.00 या वेळेत जप आणि त्यांनतर श्रींची पादपूजा असा नित्यक्रम असतो याची सांगता पालखी महोत्सवाने होते. या पालखी मिरवणूकीत वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले भजन मंडळ आणि पारंपरिक वाद्ये यांचा समावेश असतो. ही मिरवणूक भारत रत्न इंदिरा नगर येथील परिसरातून काढली जाते यावेळी ठिकठिकाणी भाविकांकडून पालखीचे स्वागत करून मनोभावे पूजा पूजा केले जाते. भक्तांकडून शिवनामाचा गजर केला जातो आणि इतरही घोषणा दिल्या जातात.. मिरवणूकीत सहभागी झालेल्या भाविकांना श्रीशैल भरले यांच्यातर्फे प्रसाद आणि सोमलिंग खराडे आणि सिद्धारुढ होळीकट्टी यांच्याकडून चहाचे वाटप करण्यात येते. पालखी महोत्सवाचे यंदाचे ५१ वे वर्ष असल्याचे श्री शरण शिवलिंगेश्वर साधु महाराज ट्रस्टचे अध्यक्ष मल्लिनाथ हुंचळगी यांनी सांगितले.