शिऊर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारात हमालांच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांनी मुगाच्या गोण्या उतरवल्या परंतु  पट्टीच्या घेण्याच्या वेळी आम्ही होण्या उतरवल्या हमाली कसली काढता म्हणून गोंधळ घालत काही काळ लिलावच बंद पाडला यासह जास्तीचा काटा कपात करण्याच्या मुद्द्यावर देखील शेतकऱ्यांनी आवाज उठवल्याचे खंडाळ्यातील शेतकरी प्रभाकर पवा र यांनी सांगितले.

Sponsored

कृष्णा हाइट्स - कोटा

कृष्णा हाइट्स की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |

सध्या मुगाची आवक सुरू असून शेड हॉलमध्ये भुसारासाठी सात हमाल आहेत. सात व्यापारी भुसार खरेदी करतात परंतु  हमालांची संख्या कमी असते, बऱ्याच वेळा लवकर मोकळे होण्याच्या दृष्टीने शेतकरी शेतमाल उतरवण्यासाठी हातभार लावतात. मंगळवारी काही शेतकऱ्यांनी शेतमाल मोजताना सातशे ते आठशे रुपये कपात केली जात असल्याचा आरोप करून लिलाव बंद पाडला. मात्र बाजार समिती कर्मचाऱ्यांनी समजूत काढत पुन्हा लिलावास सुरवात करण्यात आली. या कामी संचालक ज्ञानेश्वर जगताप यांनी व्यापाऱ्याकडून होणाऱ्या वजन कपातीवर नाराजी व्यक्त केली. दिवसभरात मुगाच्या 800 गोणी येत असताना. हमालाना अशी आवक नसल्याने हमाल वाढवणे देखील शक्य नसल्याचे बोलले जात आहे. एकूणच वाढीव वजनातील कपात आणि हमाली कपातीवर तोडगा काढण्याची बाजार समितीने प्रयत्न करण्याची आवश्यक असल्याची मागणी शेतकऱ्यातून होत आहे.