वाघोली येथील भारतीय जैन संघटना विद्यालयाचे राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात एनएमएमएस या परीक्षेत एकूण ६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी पंधरा विद्यार्थी गुणवत्ता यादीत तर २१ विद्यार्थी हे सारथी शिष्यवृत्तीस पात्र ठरलेले आहेत. ही शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकार मार्फत घेतली जाते. गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष १२ हजार रुपये याप्रमाणे पुढील चार वर्षे ही शिष्यवृत्ती मिळते. तसेच सारथी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत नऊ हजार सहाशे प्रतिवर्ष अशी पुढील चार वर्षे शिष्यवृत्ती मिळते. इयत्ता आठवी मध्ये जे विद्यार्थी आहेत व ज्यांचे उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी आहे असे विद्यार्थी या परीक्षेत बसण्यासाठी पात्र ठरतात. विद्यालयातील एकूण ८५ विद्यार्थी या परीक्षेत बसले होते.