बीड (प्रतिनिधी) गेवराई विधानसभा मतदारसंघातील तांडे वस्तीवरील रस्ते . तालुक्यातील पिकविमा अडचणीचे निवारण करणे . विमा कंपनीतुन शेतीचे पंचनामे . सर्वे . आशा आनेक विषयावर चर्चा झाली बीड येथील . शासकीय विश्रामगृहा मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत कार्य सम्राट आ.ॲड.लक्ष्मण आण्णा पवार यांनी तालुक्यातील विविध रस्त्या संदर्भात आराखडा तयार करण्याच्या सुचना दिल्या व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व इतर रस्ते अंतर्गत इंजिनीयर व संबधित कर्मचारी यांच्यासोबत बैठक घेउन त्यांना योग्य त्या सुचना दिल्या या वेळी बीड तालुक्यातील व गेवराई विधानसभा मतदार संघातील गावातील नागरिकांनी आपापल्या रस्त्यासंदर्भात माहिती दिली व आ. लक्ष्मण ( आण्णा ) पवार साहेब यांच्या सोबत चर्चा केली व रस्ते . डांबरीकरण करण्याची मागणी केली . आ अँड लक्षमण ( आण्णा ) पवार यांनी येणाऱ्या अडीच वर्षात तालुक्यातील तांडे . वस्तीवर डांबरीकरण . रस्ते करणार असल्याची माहिती दिली . यावेळी जिल्हा परिषद विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग इत्यादी विभागातील कर्मचारी अधिकारी उपस्थित होते तसेच जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांच्यासह जिल्ह्यातीले महत्वाच्या अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली यावेळी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा उपस्थित होत्या जिल्ह्यातील पिक विमा होत असलेले शेतीचे नुकसान सर्वे करून आश्या अनेक विषयी वर चर्चा होऊन या विविध कामासंदर्भात आराखडा तयार करणे या विषयी सुचना व अन्य प्रश्नासंदर्भात बैठक संपन्न झाली यावेळी दोन्ही बैठकीत उपनगराध्यक्ष राजेद्र ( दादा ) राक्षसभुवनकर .नगरसेवक आप्पासाहेब कानगुडे . जि प . सदस्य पांडूरंग थडके . गोपाळ चव्हाण विजय डरफे संतोष मुंजाळ . संतोष लाखे . सयाजी काका पवार . भगवानराव . तौर उक्कड पिंप्रीचे सरपंच सानप राजाभाऊ तिपाले आदी उपस्थित होते.