*रास्ता रोको आंदोलनाचे 11 सप्टेंबर पर्यंत ठोस लेखी आश्वासन न दिल्यास 12 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांचा ताफा आडवणार- रविकांत राठोड*
बंजारा तांड्यांच्या मूलभूत प्रश्नासाठी बंजारा ब्रिगेड आक्रमक...
एक तास पैठण ते औरंगाबाद रोडची वाहतूक ठप्प...
प्रतिनिधी -
आज दिनांक 7 सप्टेंबर रोजी पैठण महामार्गावर बंगला तांडा येथे बंजारा ब्रिगेडच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
संपुर्ण भारत स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरा करत असताना बंजारा समाजातील तांड्यावर 75 वर्षात येथील शासन प्रशासन साध्या मूलभूत सुविधा देवू शकले नसल्याने शासन प्रशासनाच्या व लोकप्रतिनिधींच्या निषेधार्थ बंजारा ब्रिगेडच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ. मुकेश राठोड, जिल्हा सचिव संतोष भाऊ राठोड व तालुका अध्यक्ष संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुका उपाध्यक्ष अक्षय राठोड यांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या उपस्थितीमध्ये बंजारा समाजाच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात यावे, बंगला तांडा येथील मंजूर असलेल्या परंतु रखडलेल्या रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, पैठण तालुका व छ. संभाजीनगर जिल्ह्यातील बंजारा तांड्यांना तात्काळ मूलभूत सुविधा पुरविणे तसेच तांड्यावरील जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळांना 10 लाखाचा निधी तात्काळ मंजूर करणे, विभागीय आयुक्त कार्यालय येथे अशोक राठोड यांचे वसंतराव नाईक महामंडळाच्या निधीसाठी 60 दिवसापासून सुरू असलेले उपोषण मागण्या मंजूर करून तात्काळ सोडवणे.या प्रमुख मागण्यांसाठी पैठण तालुक्यातील अनेक तांड्यांच्या नागरिकांनी महिला व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांना सोबत घेत बंजारा ब्रिगेडच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाच्या माध्यमातून शासन प्रशासनाने बंजारा समाजाचा संयम तोडू नये यानंतर जर या प्रलंबित मागण्या 11 सप्टेंबर पर्यंत मान्य केल्या नाही तर पुन्हा 12 सप्टेंबर रोजी रोजी असलेल्या मुख्यमंत्र्यांचा ताफा आडवनार असल्याचा इशारा बंजारा ब्रिगेड चे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड यांनी यावेळी बोलतांना दिला.
रास्ता रोको आंदोलनाच्या निवेदनावर डॉ. मुकेश राठोड जिल्हाध्यक्ष, संतोष राठोड जिल्हा सचिव, संजय पवार तालुकाध्यक्ष पैठण, अक्षय राठोड तालुका उपाध्यक्ष पैठण, संजय राठोड तालुका कोषाध्यक्ष पैठण,राहुल चव्हाण, अर्जुन राठोड तालुका उपाध्यक्ष पैठण, नितेश राठोड तालुकाध्यक्ष संभाजीनगर, सुरेश राठोड तालुका अध्यक्ष खुलताबाद, सिद्धेश्वर राठोड तालुका संघटक, चरण राठोड तालुका उपाध्यक्ष संभाजीनगर, विनोद राठोड सर्कल अध्यक्ष यांच्या सह्या आहेत.व
गोपीनाथ चव्हाण नायक, रघुनाथ राठोड प्रल्हाद राठोड केशवप राठोड संतोष राठोड दीपक राठोड भाऊसाहेब राठोड संदीप राठोड प्रकाश राठोड मनोज राठोड गोरख चव्हाण गोविंद चव्हाण रवी चव्हाण प्रदीप राठोड गजानना चव्हाण नागेश आडे गोरख राठोड विशाल राठोड एकनाथ चव्हाण दिनेश राठोड अनिल राठोड सचिन राठोड आदित्य राठोड सरपंच राठोड संजय पवार रवी राठोड किरण राठोड पदमाबई लीलाबाई अनिताबाई लताबाई बेबिबाई वानिताबई रेणुकाबई व समस्त बंगलातांडा गावकरी हजारोच्या संख्येत उपस्थित होते.महसुल विभागाच्या वतीने प्रशासकीय अधिकारी शशिकांत ठेंगे,तलाठी मोखेडे, कोतवाल किशोर अवचिंदे यांनी निवेदन स्विकारत लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरू होईल व आपल्या मागण्या वरिष्ठांना सादर करत आपणास लवकरच माहिती दिली जाईल...यावेळी बिडकिन पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने, पोलिस उपनिरीक्षक मनेश जाधव, पोलिस कर्मचारी शिवानंद बनगे, सोमनाथ तांगडे, दिलीप साळवे, राहुल बल्लाळ, नवनाथ चौधरी,भुमे, कृष्णा आधाट,चव्हाण,दंडगव्हाळ,नाडे,आदींसह मोठ्या प्रमाणावर पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.