शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार यांच्या हस्ते वाघोली गावातील अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकीत नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा कौतुक आणि सत्कार समारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन वाघोली गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब सातव यांनी केले होते. आमदार पवार यांनी निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन केले. यावेळी आमदार पवार यांनी उपस्थितांच्या सर्व समस्या काळजीपूर्वक ऐकल्या आणि प्रत्येक समस्यांचे तत्परतेने निदान करण्याचे आश्वासन दिले. 

वाघोलीला पुण्यातील सर्वाधिक पसंतीचे आणि सर्वोत्कृष्ट उपनगर करण्याच्या आमदार अशोक पवार यांच्या ध्येयाला साथ देण्याचे सर्व पदाधिकाऱ्यांनी एकदिलाने मान्य केले.

उपस्थित सर्व गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी बापूंच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाचे आणि त्यांच्या वाघोली गावाच्या विकासासाठी अविरत कष्टांचे मनापासून कौतुक केले. आमदार इतक्या सहजतेने सर्व सामान्य जनतेला उपलब्ध होतात, त्यांची कामे तत्परतेने मार्गी लावतात याचे अप्रुप प्रत्येकाला वाटले. 

यावेळी बाळासाहेब सातव यांनी देखील सर्व उपस्थितांचे मार्गदर्शन केले आणि सर्वांच्या वतीने आमदार अशोक पवार यांचे आभार मानले.