औरंगाबाद :दि.१९ नो.(दीपक परेराव )शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी एकनिष्ठ असलेले सर्व एकनिष्ठ यांचा सदैव अभिमान राहील. या निष्ठावंताना सोबत घेऊन पुन्हा भगवा फडकवू,असे प्रतिपादन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले.
संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर रत्नपूर विधानसभा मतदारसंघात आज शिवसैनिकांची आढावा बैठक घेण्यात आली.यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते आंबादास दानवे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, विभागीय सचिव अशोक पटवर्धन, संपर्कसंघटक डॉ. मनीषा कायंदे यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीतस उपजिल्हाप्रमुख भाऊ सांगळे, सहसंपर्क संघटक सुनीता देव, जिल्हासंघटक प्रतिभा जगताप, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, लता पगारे, जिल्हा युवाधिकारी मॅचिंद्र देवकर, तालुकाप्रमुख दिनेश मुथा, राजू वरकड, महिला आघाडी तालुकासंघटक अर्चना सोमासे, शहर संघटक विद्या अग्निहोत्री, संजय जैस्वाल, संपत छाजेड, तालुका युवाधिकारी ऋषिकेश धाट आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.