परभणी,दि.24(प्रतिनिधी) : संत श्री साईबाबा यांच्या पाथरीतील जन्मभूमीच्या विकास आराखड्यास आगामी शिखर बैठकीतून मंजूरी बहाल केली जाईल व या वर्षीच्याच आर्थिक वर्षात विकास कामांकरीता पहिला हफ्ता दिला जाईल, असे ठोस आश्‍वासन राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

           आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी या पावसाळी अधिवेशनात बुधवारी (दि.24) विधानपरिषदेत संत साईबाबा यांच्या जन्मभूमीच्या प्रलंबित विकास आराखड्याचा मंजूरीचा विषय उपस्थित केला. दोन वेळा विकास आराखडा सादर करण्यात आला. शिखर समितीच्या दोनवेळा बैठका झाल्या परंतु, सुमारे 149 कोटी रुपयांचा आराखडा अद्याप मंजूर झाला नाही, अशी खंत व्यक्त केली. 

विकास आराखड्याबाबत होणार्‍या विलंबाने दिवसेंदिवस कामांचा खर्च वाढतो आहे तसेच संत साईबाबांच्या जन्मभूमीत साईभक्तांची मूलभूत सोयी सुविधांअभावी मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे, असे स्पष्ट केले. 

बिहारचे तत्कालीन राज्यपाल रामनाथ कोविंद यांनी आपल्या पाथरी दौर्‍यातून संत साईबाबा यांच्या मंदिरास भेट दिली. ट्रस्ट सदस्यांबरोबर चर्चा केली व विकास आराखडा तयार करा, अशी सूचना केली. त्याप्रमाणे जिल्हाधिकार्‍यांमार्फत पाथरीच्या या जन्मभूमी विकासाच्या 201 कोटी रुपयांच्या आराखड्यास प्रसासनाने राज्य सरकारकडे सादरीकरण केल्यानंतर शिखर समितीद्वारे सुधारीत आराखड्याचा सल्ला देण्यात आला. त्याहीप्रमाणे जिल्हा प्रशासनाने 149 कोटी रुपयांचा आराखडा सादर केला. विशेषतः मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या आराखड्यासंदर्भात मुंबईतील राजभवनात विशेष बैठक बोलावून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंजूरी संदर्भात सूचना दिल्या होत्या, असे आमदार दुर्राणी यांनी निदर्शनास आणून तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या आराखड्यास मंजूरी देवू व पैसाही उपलब्ध करु, असा शब्द दिला होता. असे स्पष्ट केले. शिंदे हे आता राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी तो शब्द पाळावा व श्री साईबाबा यांच्या जन्मभूमीच्या आराखड्यास शिखर बैठकीतून मंजूरी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.