बीड (प्रतिनिधी) बीड येथील एका शासकीय कर्मचाऱ्याने व्हॉट्स ॲपला आज शेवटचा दिवस स्टेट्स ठेवून आत्महत्या करण्याच्या उद्देशाने पाली घाटाकडे रवाना झाले. परंतु स्वप्नील गुंड या पोलीस कर्मचाऱ्यांच्या हे स्टेटस पहाण्यात येताच त्यांनी याची माहिती अनेकांना देऊन एक तासाच्या सदरील इसमाचा शोध घेतला व आत्महत्येपासून परावृत करुन सुखरूप घरी पोचविले. यामुळे एकाचे प्राण वाचले असल्याने या कामगिरीबद्दल बीड पोलीसांचे कौतुक करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बीड येथील स.द. येथील एका कर्मचाऱ्याने बुधवारी (दि. २४) सायंकाळी ६:२८ वाजण्याच्या सुमारास आपल्या व्हॉट्स ॲपला इंग्रजी मध्ये "आज माझा आयुष्याचा शेवटचा दिवस आहे" असा स्टेटस ठेवला होता. हा स्टेटस पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील गुंड यांनी ६:३९ वाजता पाहिले. तो व्यक्ती आर्थिक विवंचनेत असून तो कोणतंही टोकाच पाऊल उचलु शकतो त्यामुळे गुंड यांनी सदरील व्यक्तीला फोन लावला परंतु तो नंबर बंद होता. दुसऱ्या नंबरवर संपर्क केला असता फोन लागत होता परंतु उत्तर मिळत नव्हते. गुंड यांनी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना सदरील व्यक्तीचा फोटो पाठवून शोध घेण्यास सांगितले तर डायल ११२ ला शोध घेण्यासाठी माहिती देण्यात आली. तसेच सायबर सेलच्या मपोउपनि क्रांती ढाकणे व पो. कॉ. ए.व्ही. सुरवसे यांनी सदरील व्यक्तीचे लोकेशन मिळवले असता ते कपिलधार ते मांजरसुंभा दरम्यान दाखवत होते. लोकेशनच्या आधारे पो. कॉ. स्वप्नील गुंड व पो.कॉ. रोहित शिंदे यांनी दुचाकीवरून धाव घेत प्रथम बिंदुसरा प्रक्लप परिसरात शोध घेतल पण तिथे मिळून न आल्याने मांजरसुंभा महामार्ग पोलीसांना सदरील व्यक्तीचे फोटो पाठवून मांजरसुभा ते बीडकडे येणाऱ्या रस्त्यावर शोध घेण्यासाठी सांगितले त्यांनी ही शोध सुरू केला. नियमित सदरील व्यक्तीला संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू होता. एकदा त्याने उत्तर देत मी चाललो म्हणून फोन कट केला. दरम्यान सदरील व्यक्ती महामार्ग पोलीसांना मांजरसुंभा घाटा जवळ निर्मनुष्य ठिकाणी दिसून आले.त्यांनी ताब्यात घेऊन आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. समजुत काढून घरी सुखरूप आणून सोडले. बीड पोलीस दलाच्या सतर्कतेमुळे अवघ्या ५६ मिनिटांत व्यक्तीचा शोध घेत त्यास आत्महत्या करण्यापासून परावृत्त केल्याने मोठा अनर्थ टळला. यामुळे बीड पोलीसांचे कौतुक करण्यात येत आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
અમરેલી જિલ્લાના ખેડૂતોને ડ્રોન ટેકનોલોજીથી પ્રવાહી ખાતરનો છંટકાવ કરાવવા માટે આઈ-ખેડૂત પોર્ટલ પર ઓનલાઈન અરજી કરવી
અમરેલી જિલ્લાના ખેડૂતોને ડ્રોન ટેકનોલોજીથી પ્રવાહી ખાતરનો છંટકાવ કરાવવા માટે આઈ-ખેડૂત પોર્ટલ પર...
દાહોદ : જેસાવાડા ધાનપુર રોડ પર અકસ્માતમાં પોલીસ કર્મી નું મોત#live24newsgujarat
દાહોદ : જેસાવાડા ધાનપુર રોડ પર અકસ્માતમાં પોલીસ કર્મી નું મોત#live24newsgujarat
जयपुर में युवक ने स्ट्रीट डॉग की आंख फोड़ी:डंडे से पीटकर अधमरा किया, लोगों को भी धमकाने लगा
जयपुर में बाइक सवार युवक के एक स्ट्रीट डॉग को पीट-पीटकर अधमरा कर दिया गया। पत्थर से वार कर उसकी...
पन्हाळा तालुक्यातील पोहाळे तर्फ आळते येथे वन विभागाने पकडले उद जातीचे मांजर
तालुक्यातील पोहाळे तर्फ आळते येथील यशवंत लहू बेनाडे यांच्या घरा पाठीमागे असणाऱ्या शेडमध्ये...
Second Hand Car: यहां से खरीदेंगे कार तो नहीं लगेगा रोड टैक्स! मोटा पैसा भी बचेगा
नई कार खरीदने पर आपको रोड टैक्स समेत और भी चीजों का चार्ज देना पड़ता है। जिसकी वजह से कार...