वैजापूर :-

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

वैजापूर तालुक्यात अवैध व टेंडरच्या नावाखाली ओव्हरलोड वाळूची अवैध वाहतूक रात्रंदिवस सुरू आहे ज्यामुळे वैजापूर तालुक्यातील श्रीरामपूर-वैजापूर या रस्त्याची अक्षरशः दयनिय अवस्था झालेली आहे.या रस्त्यावर हजारो खड्डे झालेले आहे ज्यामुळे नागरिकांना प्रवास दरम्यान शितफिची कसरत करावी लागत आहे.हे खड्डे वाचविण्याच्या नादात रोज अनेक अपघात या रस्त्यावर होत आहेत.परंतु स्थानिक महसुल व सार्वजनिक बांधकाम प्रशासनाने या सर्व प्रकारावर गांधारी प्रमाणे डोळ्याला पट्टी लाऊन दुर्लक्ष करत आपली पाठ फिरवलेली आहे.ज्यामुळे तालुक्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे स्टाईल पद्धतीने आंदोलन करून प्रशासनाच्या डोळ्यांवरील पट्टी काढण्याचा अनोखा प्रयोग सोमवार(ता.22)रोजी केला.सोमवारी वैजापूर तालुक्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी लाडगाव तेथे चक्क खड्ड्यांची  पुष्पहार घालून या खड्ड्याना गुलाल वाहून आणि अगरबत्ती फिरवून पूजा करत प्रशासनाला याविषयावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली.यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब घंगाळे, मनसे तालुका अध्यक्ष सुनील गायकवाड,सचिन तुरे,संतोष सोमवंशी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.