*मौजे झोला (पिंपरी) येथील अखंड हरिनाम सप्ताहची सांगता*
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
परभणी
काय सांगू आता संतांचे उपकार | मज निरंतर जागविती ||
काय द्यावे त्यासी व्हावे उतराई | ठेविता हा पायी जीव थोडा ||
महाराष्ट्रामध्ये अनेक थोर संत होऊन गेले, त्यांनी मानवी जीवनाचा सार व जगण्याचा अर्थ आपल्या चरित्रातून समाजासमोर ठेवला आहे. अखंड महाराष्ट्र संत परंपरेने व वारकऱ्यांच्या त्यागाने घडवला आहे. त्यामुळेच तर मी सदैव वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक असतो असे उद्गार आ.डॉ. रत्नाकररावजी गुट्टे यांनी वैराग्यमूर्ती झोलकर नाना, सद्गुरु सेवा संस्थान गोदातट झोला पिंपरी ता. गंगाखेड येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सांगता सोहळ्या प्रसंगी व्यक्त केले.
श्रावण वैद्य ३ रविवार दि. १४ ऑगस्ट पासून मौजे झोला पिंपरी येथे वैराग्यमूर्ती श्री ह भ प झोलकर नाना यांच्या सद्गुरु सेवा संस्थानात त्यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास सुरुवात झाली. या निमित्त पहाटे ४ ते ६ काकड आरती, ६ ते १० गाथा पारायण, १० ते १२ महा अभिषेक, १ ते ३ हरिकीर्तन, ५ ते ६ हरिपाठ, ६ ते ८ हरिकीर्तन व नंतर हरिजागर अशा दैनंदिन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रावण वद्य १० रविवार दि.२१ ऑगस्ट रोजी आ.डॉ. रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांच्या वतीने त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रेखाताई गुट्टे यांच्या शुभहस्ते सकाळी महापूजा करण्यात आली व त्यानंतर श्री संत मोतीराम महाराज यांच्या पालखीची हरिनामाच्या गजरात, असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत ग्राम प्रदर्शना करण्यात आली. श्री ह.भ.प. राम महाराज आखेगावकर यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर श्री ह.भ.प. बालासाहेब महाराज उखळीकर व श्री ह.भ.प. अंकुश महाराज मोळवणकर यांच्या हस्ते काल्याच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ. रत्नाकररावजी गुट्टे यांच्या वतीने याप्रसंगी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. आ. डॉ. रत्नकररावजी गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सुविज्ञ पत्नी सौ. रेखाताई गुट्टे यांच्या वतीने उपस्थित सर्व महाराज मंडळी व गुणीजनांचा सत्कार करून या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली.
याप्रसंगी वारकरी परंपरेतील साधुसंत, वारकरी, टाळकरी, पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.