झोडगा बु.(नवीन वस्ती) मधील जि.प.प्राथमिक शाळेचा प्रश्न सुटता सुटेना - झोडगा बु.ग्रामस्थांचा प्रश्न
गटग्रामपंचायात झोडगा बु. येथील
सचिव,सरपंच ला दिले निवेदन पत्र
गट ग्रामपंचायत झोडगा बु.(न.व) मधील जि.प. प्राथमिक शाळेचा प्रशासनाने थोडा तरी विचार करून NH क्र.१६१ मध्ये जि.प.प्राथमिक शाळेच्या इमारतीचे अधिग्रहण/नष्ट होऊन जवळपास एक ते दीड वर्ष पूर्ण झाले असून विद्यार्थी वर्ग आणि शिक्षक वर्गांना भोगावा लागतो कारण एक रूम अधिग्रहण झालेली आहे पण नष्ट झालेली नसून अशी एक रूम आहे .छतावरील टीन/पत्रे खराब झाले असून पाऊस आला की पाण्याच्या धारा लागतात. सांगा बरं सरकार काय करायचं,असे विद्यार्थि म्हणतात. एका वर्ग खोली मध्ये वर्ग १ ते ५ पर्यंतचे विद्यार्थी अंदाजे ४०-४५ विद्यार्थ्यांना जबरदस्तीने घ्यावे लागते शिक्षण शिक्षक वर्गांनी कसे शिकवावे.तरी सुध्दा या बालवयाच्या शिक्षणाकडे कुणाचे ही लक्ष नसून शालेय इमारतीच्या अडचणीमुळे पाहिजे तस शिक्षण या बाल वयामध्ये मिळत नसून तरी त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षक वर्गाला ही अडचणी निर्माण होत असुन त्रास सहन करावा लागतो. तरी पुढील भविष्याचा विचार प्रशासनाने करून मार्ग मोकळा करावा आणि जि.प.प्राथमिक शाळेच्या जागेचा प्रश्न हा प्रशासनाने लक्ष देऊन झोडगा बु.(न.व) मधील ई-क्लास च्या जागे वरील अतिक्रमण हटवून शाळेच्या इमारतीसाठी जागा मंजूर करून द्यावी.आणि इमारतीच्या बांधकामाला आणि इतर कामकाजाला लवकरात लवकर सुरुवात करावी.अशी विनंती युवा सामाजिक कार्यकर्ते,वरीष्ठ व सामान्य नागरिक आणि सर्व ग्रामस्थ मंडळी झोडगा बु.आणि विद्यार्थांचा हक्काचा सदर विचार करावा आणि सर्व निर्णय घेवून प्रशासनाकडून अपेक्षा ठेवतो की लवकरात लवकर विद्यार्थ्यांना न्याय मिळावा ही ग्रामस्थांनी नीवेदनात म्हटले आहे.शालेय समितीचे अध्यक्ष गौतम गवई, पो.पा शामराव धाबे, युवा सामाजिक कार्यकर्ते - दिपक धाबे,अमोल जाधव,गजानन आवटे,गोपाल घुगरे तसेच वरिष्ठ व सामान्य नागरिक आणि सर्व ग्रामस्थ झोडगा बु. आदींनी निवेदन दिले आहे.