शिरूर दिनांक ( वार्ताहर ) सापाने चावा घेतल्याने २ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यु झाला आहे . जान्हवी कुमारी विमलकुमार राम वय-2 वर्ष सध्या राहणार निमोणे , ता. शिरुर जि पुणे मूळ रा. दिघली हसनपुर वार्ड 33 किसनगंज बिहार असे तीचे नाव आहे . यासंदर्भात पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विमलकुमार बहादुर राम वय 27 वर्ष, व्यवसाय मजुरी रा. काळेवस्ती रोड निमोणे ता. शिरुर जि.पुणे मुळ गाव रा. दिघली हसनपुर वार्ड 33 किसनगंज बिहार यांनी पोलीस ठाण्यात खबर  दिली आहे. 29 ऑगट 2024 रोजी सायंकाळी साडेसहाच्या  सुमारास विमलकुमार व त्यांची पत्नी व मुलगी असे घरी असतांना मुलगी जान्हवी कुमारी ही घराचे बाहेरील व्हराडयामध्ये मांजरा सेाबत खेळत होती, अचानक मुलीचा रडण्याचा आवाज आल्याने ते व पत्नी मुलीस पहायला गेले असता तेथे सापाने डावे पायाला चावा करताना बघितले . विमलकुमार यांनी मुलीली जवळ घेतले असता साप हा जवळ असलेले बिळामध्ये जातांना दिसला त्यानंतर त्यांनी शेतमालक संभाजी ढगे यांना फोन करून सांगीतले वर ते शेतात आले व त्यांनी त्याचे गाडी मधुन मुलीस उपचार कामी ग्रामीण हास्पीटल शिरुर येथे आणले असता तेथील डॉक्टरानी जान्हवी कुमारी विमलकुमार राम वय-2 वर्ष हे मृत्यु पावल्याचे घोषित केले . यसंदर्भात आधिक तपास पोलीस निरीक्षक शिरूर जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विनोद मोरे करीत आहेत