शिरुर दिनांक ( वार्ताहर ) चांगल्या मनोबलाच्या आधारे आपल्या आयुष्याला आकार द्या व देशाचे चांगले नागरिक बना असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी केले . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वतीने महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा सन २०२३-२४ मधील शिरूर तालुक्यातील राज्य गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केलेल्या ६५ हून आधिक गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान सोहळा शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालय येथे करण्यात आला . यावेळी माजी सनदी आधिकारी व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर , मनसे नेते बाबू वागस्कर ,पुणे जिल्हा अध्यक्ष रामदास दरेकर ,मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष हेमंत बत्ते ,गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर , प्राचार्य डॉ . अमोल शहा , माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर , जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर , साईनाथ ढमढेरे , भाजपाचे नेते नोटरी धर्मेंद्र खांडरे , आम्ही शिरुरकर फाउंडैशनचे बापू सानप , माजी प्राचार्य दिलिप देशमुख , व्यवसायिक राजेश कोकणे , प्रा. चंद्रकांत धापटे ,शिक्षण मंडळाचे माजी सभापती प्रभूलिंग वळसंगे,  बाजार समितीचे माजी सचिव दिलिप मैड , माजी उपसरपंच गणेश खोले ,रावसाहेब चक्रे , आदी यावेळी उपस्थित होते . किशोरराजे निंबाळकर म्हणाले की तालुक्यातील ६५ हून आधिक गुणवंताचा सत्कार केला. शिरुर तालुक्याला गुणवत्तेची मोठी परंपरा आहे . विद्यार्थ्याना योग्य मार्गदर्शन शिक्षकांनी केले व विद्यार्थ्यानी यश मिळविले .विद्यार्थ्यानी अडचण अपयश आले तरी खचून जाउ नये ,स्वंत:चे आयुष्य स्वंत:च्या मनोबलावर अवलंबून असते . अपयश अडचणीवर मात करुन यश मिळवा . बुध्दी व गुणवत्तेचा जोरावर अडथळांवर मात करावी असे निंबाळकर म्हणाले . या देशाचे चांगले नागरिक बना . चांगल्या मनोबलाच्या आधारे आपल्या जीवनाला आयुष्याला आकार द्या . मोबाईल वापरा संदर्भात विद्यार्थ्यानी व पालकांनी नियम पाळले पाहीजेत .मुले अनुकरणशील असतात त्यामुळे मोबाईलचा वापर जागरुकतेने करावा . पालकांनी मुलांशी नियमित संवाद साधला पाहीजे . शैक्षणिक व प्रशासनात शिरुर तालुक्याचे मोठे कर्तृत्व असल्याचे निंबाळकर म्हणाले मनसेचे नेते बाबू वागस्कर म्हणाले की शिक्षक व विद्यार्थी या दोघांच्या या कार्यक्रमाचा निमित्ताने एकत्रित सत्कार होतो हे कौतुकास्पद आहे . चांगल्या शिक्षणातून चांगले विद्यार्थी व पिढी घडत असते . शिक्षकांच्या पाठी मागे मनसे उभा आहे शिक्षकांना शैक्षणिक कामाव्यतिरिक्त अन्य कामे द्यायला नको असे ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी केले . सूत्रसंचालन कुमुदिनी बो-हाडे व शहाजी पवार यांनी केले . आभार संजय बारवकर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनसेचे तालुका संघटक अविनाश घोगरे , शहराध्यक्ष ॲड . आदित्य मैड , संदिप कडेकर ,रवि लेंडे , प्रवासी संघाचे अनिल बांडे , अण्णा दौंडकर सुनील खेडकर , बाळासाहेब कुंभार ,अस्लम शेख , विनायक खांडरे ,रंगनाथ भालेराव ,आदीनी प्रयत्न केले . यावेळी खालील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . जिल्हा परिषद शाळा शिक्रापूर उत्कर्षा दानवे , मनस्वी नाईक , अथर्व पारखे , श्रावणी कुताळ , जिज्ञासा मगदूम , श्रावणी म्हसके , जान्हवी जगदाळे , जिवीका वानखेडे , आदर्श गायकवाड , प्रतिक्षा वाघ , महेश डोईफोडे , जिल्हा परिषद शाळा कोयाळी पुनर्वसन - सोहम बेंद्रे , ऋतुराज दरेकर ,गार्गी जावळे , स्वराज्य राउत , अराध्य ढोबळे , आदिती झगडे , प्रणव ढोकले , शिवम जाधव ,श्रावणी आढाव , जिल्हा परिषद शाळा पिपळे खालसा - अंश ठाकूर , वीरेन धुमाळ , आर्या घोलप , परी धुमाळ जिल्हा परिषद शाळा वाबळेवाडी - आदिश शिरसाठ ,राजवर्धन चातुर , स्वरुप भागवत , प्रतिक धुमाळ , तनुश्री टेमगिरे , ज्ञानेश अरगडे , जिल्हा परिषद शाळा जातेगाव बु - आयुष इंगवले ,सोहम इंगवले जिल्हा परिषद शाळा खैरेवाडी - राजेश्वरी बाबर , यशदा थोरात , तनिषा चव्हाण विद्याधाम प्रशाला शिरुर - सृष्टी जगताप , श्रेया डोळस जिल्हा परिषद शाळा कवठे येमाई स्वरा साळकर , देवदत्ता साकोरे जिल्हा परिषद शाळा वसेवाडी - प्रदिक्षा गाडे जिल्हा परिषद शाळा पिंपरखेड - अश्विन पिंपळे दत्त विद्यामंदिर पिंपरखेड - समृध्दी पिंपळे , संस्कृती पानमंद ,सुदर्शनी ढगे जिल्हा परिषद शाळा वाबळेवाडी - ऋत्विज सावंत , विवेक कदम , श्रावणी इंगवले , आदिती मोरे , वेदांत बो - हा डे माध्यमिक शाळा सणसवाडी - स्वरदा दरेकर , अनुष्का हरगुडे जिल्हा परिषद शाळा डावखरे विद्यालय हिवरे कुंभार - सुशृत तथे , ओंकार धुमाळ जिल्हा परिषद शाळा विद्याधाम कान्हूर मेसाई - प्राची खैरे , अनुष्का खैरे जिल्हा परिषद वसेवाडी तुषार ढेकळे न्यु इंग्लिश स्कूल कवठे येमाई - स्वराली गायकवाड आदिती कोकणे विद्याधाम प्रशाला - परिजा मगर , तनिषा पवार i