शिरुर दिनांक ( वार्ताहर ) चांगल्या मनोबलाच्या आधारे आपल्या आयुष्याला आकार द्या व देशाचे चांगले नागरिक बना असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी केले . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वतीने महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा सन २०२३-२४ मधील शिरूर तालुक्यातील राज्य गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केलेल्या ६५ हून आधिक गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान सोहळा शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालय येथे करण्यात आला . यावेळी माजी सनदी आधिकारी व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर , मनसे नेते बाबू वागस्कर ,पुणे जिल्हा अध्यक्ष रामदास दरेकर ,मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष हेमंत बत्ते ,गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर , प्राचार्य डॉ . अमोल शहा , माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर , जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर , साईनाथ ढमढेरे , भाजपाचे नेते नोटरी धर्मेंद्र खांडरे , आम्ही शिरुरकर फाउंडैशनचे बापू सानप , माजी प्राचार्य दिलिप देशमुख , व्यवसायिक राजेश कोकणे , प्रा. चंद्रकांत धापटे ,शिक्षण मंडळाचे माजी सभापती प्रभूलिंग वळसंगे, बाजार समितीचे माजी सचिव दिलिप मैड , माजी उपसरपंच गणेश खोले ,रावसाहेब चक्रे , आदी यावेळी उपस्थित होते . किशोरराजे निंबाळकर म्हणाले की तालुक्यातील ६५ हून आधिक गुणवंताचा सत्कार केला. शिरुर तालुक्याला गुणवत्तेची मोठी परंपरा आहे . विद्यार्थ्याना योग्य मार्गदर्शन शिक्षकांनी केले व विद्यार्थ्यानी यश मिळविले .विद्यार्थ्यानी अडचण अपयश आले तरी खचून जाउ नये ,स्वंत:चे आयुष्य स्वंत:च्या मनोबलावर अवलंबून असते . अपयश अडचणीवर मात करुन यश मिळवा . बुध्दी व गुणवत्तेचा जोरावर अडथळांवर मात करावी असे निंबाळकर म्हणाले . या देशाचे चांगले नागरिक बना . चांगल्या मनोबलाच्या आधारे आपल्या जीवनाला आयुष्याला आकार द्या . मोबाईल वापरा संदर्भात विद्यार्थ्यानी व पालकांनी नियम पाळले पाहीजेत .मुले अनुकरणशील असतात त्यामुळे मोबाईलचा वापर जागरुकतेने करावा . पालकांनी मुलांशी नियमित संवाद साधला पाहीजे . शैक्षणिक व प्रशासनात शिरुर तालुक्याचे मोठे कर्तृत्व असल्याचे निंबाळकर म्हणाले मनसेचे नेते बाबू वागस्कर म्हणाले की शिक्षक व विद्यार्थी या दोघांच्या या कार्यक्रमाचा निमित्ताने एकत्रित सत्कार होतो हे कौतुकास्पद आहे . चांगल्या शिक्षणातून चांगले विद्यार्थी व पिढी घडत असते . शिक्षकांच्या पाठी मागे मनसे उभा आहे शिक्षकांना शैक्षणिक कामाव्यतिरिक्त अन्य कामे द्यायला नको असे ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी केले . सूत्रसंचालन कुमुदिनी बो-हाडे व शहाजी पवार यांनी केले . आभार संजय बारवकर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनसेचे तालुका संघटक अविनाश घोगरे , शहराध्यक्ष ॲड . आदित्य मैड , संदिप कडेकर ,रवि लेंडे , प्रवासी संघाचे अनिल बांडे , अण्णा दौंडकर सुनील खेडकर , बाळासाहेब कुंभार ,अस्लम शेख , विनायक खांडरे ,रंगनाथ भालेराव ,आदीनी प्रयत्न केले . यावेळी खालील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . जिल्हा परिषद शाळा शिक्रापूर उत्कर्षा दानवे , मनस्वी नाईक , अथर्व पारखे , श्रावणी कुताळ , जिज्ञासा मगदूम , श्रावणी म्हसके , जान्हवी जगदाळे , जिवीका वानखेडे , आदर्श गायकवाड , प्रतिक्षा वाघ , महेश डोईफोडे , जिल्हा परिषद शाळा कोयाळी पुनर्वसन - सोहम बेंद्रे , ऋतुराज दरेकर ,गार्गी जावळे , स्वराज्य राउत , अराध्य ढोबळे , आदिती झगडे , प्रणव ढोकले , शिवम जाधव ,श्रावणी आढाव , जिल्हा परिषद शाळा पिपळे खालसा - अंश ठाकूर , वीरेन धुमाळ , आर्या घोलप , परी धुमाळ जिल्हा परिषद शाळा वाबळेवाडी - आदिश शिरसाठ ,राजवर्धन चातुर , स्वरुप भागवत , प्रतिक धुमाळ , तनुश्री टेमगिरे , ज्ञानेश अरगडे , जिल्हा परिषद शाळा जातेगाव बु - आयुष इंगवले ,सोहम इंगवले जिल्हा परिषद शाळा खैरेवाडी - राजेश्वरी बाबर , यशदा थोरात , तनिषा चव्हाण विद्याधाम प्रशाला शिरुर - सृष्टी जगताप , श्रेया डोळस जिल्हा परिषद शाळा कवठे येमाई स्वरा साळकर , देवदत्ता साकोरे जिल्हा परिषद शाळा वसेवाडी - प्रदिक्षा गाडे जिल्हा परिषद शाळा पिंपरखेड - अश्विन पिंपळे दत्त विद्यामंदिर पिंपरखेड - समृध्दी पिंपळे , संस्कृती पानमंद ,सुदर्शनी ढगे जिल्हा परिषद शाळा वाबळेवाडी - ऋत्विज सावंत , विवेक कदम , श्रावणी इंगवले , आदिती मोरे , वेदांत बो - हा डे माध्यमिक शाळा सणसवाडी - स्वरदा दरेकर , अनुष्का हरगुडे जिल्हा परिषद शाळा डावखरे विद्यालय हिवरे कुंभार - सुशृत तथे , ओंकार धुमाळ जिल्हा परिषद शाळा विद्याधाम कान्हूर मेसाई - प्राची खैरे , अनुष्का खैरे जिल्हा परिषद वसेवाडी तुषार ढेकळे न्यु इंग्लिश स्कूल कवठे येमाई - स्वराली गायकवाड आदिती कोकणे विद्याधाम प्रशाला - परिजा मगर , तनिषा पवार i
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
अतीक के बाद अब मुख्तार के करीबियों पर प्रशासन की नजर, माफिया के शूटर अंगद राय की कुर्क हो सकती है संपत्ति
माफिया मुख्तार अंसारी के कुनबे के साथ ही उसके सहयोगियों के खिलाफ भी जिला प्रशासन व पुलिस की...
गांव श्योसिंहपुरा व खलीलाबाद छिला वाले बालाजी मंदिर परिसर में लगाएं कल्प वृक्ष का जोडा
सिरस के गांव श्योसिंहपुरा व खलीलाबाद गांव के छिला वाले बालाजी मंदिर परिसर में कल्प वृक्ष के पौधे...
Team India Schedule in Asian Games 2023: भारत पाक में फिर हो सकती टक्कर | Ind vs PAK in Asian Games
Team India Schedule in Asian Games 2023: भारत पाक में फिर हो सकती टक्कर | Ind vs PAK in Asian Games