शिरुर दिनांक ( वार्ताहर ) बिबट्याप्रवण क्षेत्र असणा-या शिरुर तालुक्यात शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . या संदर्भातील प्रश्न विधानसभेचा आधिवेशनात मांडण्यात आला होता असे आमदार ॲड. अशोक पवार यांनी सांगितले . शिरुर येथे बातमीदारांसमवेत ते बोलत होते यावेळी एमएसईबीचे कार्यकारी आधिकारी सुनील जाधव , घोडगंगा कारखान्याचे संचालक वाल्मिकराव कुरुंदळे , पांडुरंग थोरात  , आदी उपस्थित होते . पवार म्हणाले की शिरुर तालुक्यात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर असून माणसांवर व जनावरांवर हल्ले ही बिबट्याने केलेले आहेत . तालुक्यात  बिबट्या प्रणव क्षेत्र असल्याने शेतक-यांना रात्रीच्या वेळेस शेतीला पाणी देणे अवघड बनले होते .शेतकरी वर्गाकडूनही शेतीला दिवसा वीजपुरवठा व्हावा याकरीता मागणी केली जात होती . मागील विधानसभा आधिवेशनात ही हा प्रश्नी आवाज उठविला होता . यंदाचा आधिवेशनात या प्रश्नांवर दिवसा वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .ज्या ठिकाणी लोड घेता येवू शकतो त्या ठिकाणी आज पासून दिवसा वीज पुरवठा करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले . २२ केव्ही लाईन असणा-या ट्रान्सफार्मरला तांब्याचा तारा असतात. तारा तांब्याचा असल्याने त्या चोरीला जाण्याचे प्रमाण मोठे आहे . ३३ बाय ११ ट्रान्सफार्मर सध्या उभे करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे या ट्रान्सफार्मर मध्ये तांब्याचा तारा ऐवजी ॲल्युनियमचा तारा टाकण्यात येणार आहे त्यामुळे चोरीचे प्रमाण कमी होणार असल्याचे पवार यांनी सांगितले .फिडरच्या जुन्या तारा बदलण्याचे काम सुरु करण्यात आले आहे .वडगाव रासाईच्या फिटरला एअर बंद केबल टाकण्याचे काम सुरु करण्यात आले आहे . शिरुर शहर व सरदवाडीत ही काम सुरु करण्यात आले आहे . निर्वी व चिंचणी असे दोन नवे फिडर करण्यात आले असल्याचे पवार म्हणाले .