बिडकिन करांचे लक्ष वेधून घेणारी वृक्षदिंडी....

बिडकीन ( वार्ताहर) .. भारतीय स्वातंत्र्यास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यामुळे केंद्र सरकारने हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे.त्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी व प्रत्येक भारतीयांच्या मनात ज्वाजल्य देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी प्रभातफेरी, स्वातंत्र्य संग्रामावर आधारित निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, समूहगीत गायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वृक्षदिंडी, ऑलिम्पिक विजेता खेळाडूंची माहिती प्रदर्शन, स्वच्छता अभियान अशा विविध उपक्रमांचे आयोजन पैठण तालुक्यातील श्री. सरस्वती भुवन प्रशाला बिडकीन येथे आयोजित करण्यात आले होते.१४ ऑगस्ट चे ध्वजारोहण शालेय समितीचे जेष्ठ सदस्य किसनलाल तोतला यांच्या हस्ते तर शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार वैद्य मुख्याध्यापक मनोहर चित्तोडकर उपमुख्याध्यापक राजेंद्र कोठावदे,मानद मुख्याध्यापक किशोर कुलकर्णी, शालेय समितीचे सदस्य आंताराम धरपळे, पर्यवेक्षिका राजश्री देशपांडे विलास सोनजे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.यानंतर वृक्षांचे मानवी जीवनातील महत्व व वृक्ष संवर्धन काळाची गरज याविषयी जनजागृती करण्यासाठी इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.या वृक्षदिंडीला शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार वैद्य मुख्याध्यापक मनोहर चित्तोडकर उपमुख्याध्यापक राजेंद्र कोठावदे,मानद मुख्याध्यापक किशोर कुलकर्णी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरूवात करण्यात आली.यावृक्षदिंडीमध्ये विद्यार्थीनी तिरंगी ध्वजाच्या रंगाच्या केसरी, पांढरा,निळा, हिरव्या रंगाच्या नऊवारी साड्या तर विद्यार्थी पांढरा कुर्ता व पांढरा पायजमा, डोक्यावर पांढरी टोपी, कपाळावर टिळा अशा वारकरी संप्रदायाचा पोशाख घालून सहभागी झाले होते. सर्वात पुढे भारतमाता,तिरंगा ध्वज नंतर वारकरी पोशाखातील पाऊली पथक,पखवाज,टाळ व हातात छोट्या झाडाचे रोपटे घेतलेले वारकरी सहभागी झाले होते.या मध्ये विद्यार्थी " झाडे लावा,जीवन वाचवा,या धरतीचे स्वर्ग बनवा", वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी होईल घरोघरी,,' वृक्ष लावा, पाऊस वाढवा ' अशा घोषणा देऊन बिडकीनकरांचे लक्ष वेधून घेतले.नंतर शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार वैद्य मुख्याध्यापक मनोहर चित्तोडकर उपमुख्याध्यापक राजेंद्र कोठावदे शालेय समितीचे सदस्य किसनलाल तोतला, डॉ.आंताराम धरपळे,मानद मुख्याध्यापक किशोर कुलकर्णी,आसिफ शेख, ज्ञानेश्वर चाटुपळे, विलास सोनजे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या विभागाचे ज्ञानेश्वर चाटुपळे,आसिफ शेख, किशोर नांवकर,एन.सी.सी.विभाग प्रमुख मंगेश डोलारे, हेमंत जोशी,एन.सी

सी चे सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.