शिरुर दिनांक ( वार्ताहर ) चालू खरिप हंगामात जून महिन्यात सरासरीच्या 160% पाऊस झालेला आहे. पाऊस वेळेत आल्यामुळे तालुक्यात चांगल्याप्रकारे पेरण्या झालेल्या आहेत.खरिप हंगामातील प्रमुख (तृणधान्य, कडधान्य, गळीतधान्य) पिकांची सरासरीच्या 80% पेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झालेली असल्याचे तालुका कृषि आधिकारी सिध्देश ढवळे यांनी सांगितले . चालू खरिप हंगामात जून महिन्यात सरासरीच्या 160% पाऊस झालेला आहे. पाऊस वेळेत आल्यामुळे तालुक्यात चांगल्याप्रकारे पेरण्या झालेल्या आहेत. तालुक्यात बाजरीची 13227 हे. मका : ११६२ हे ,मूग 10572 हे . , उडीद 402 हे ,तूर 215 हे ,सोयाबीन 3486 हे ,कापूस 605 हेक्टर वर तर आडसाली ऊसाच 12581 हेक्टर वर पेरणी झाली आहे