शिरूर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर केडगाव चौफुला रस्त्यावर दोन मोटारसायकलच्या झालेल्या धडकेत दोन जण मरण पावले आहेत . महादेव भगवान शेलार रा. नागरगाव ,ता शिरूर ,जि .पुणे व अनुज शिवाजी गायकवाड वय २४ वर्षे रा .केडगाव ता. दौंड जि पुणे अशी मरण पावलेल्यांची नावे आहेत . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी हेमंत नंदकुमार शेलार वय ४१ वर्षे धंदा शेती रा. नागरगाव ता शिरूर यांनी फिर्याद दिली आहे . महादेव शेलार व अनुज गायकवाड हे ३१ मे २०२४ रोजी रात्री ९/०० वा सुमारास शिरूर चौफुला रोडवर जगतापवस्ती जवळून स्प्लेंडर प्लस मोटार सायकल नं एम. एच ४२ ए. झेड ३५३९ व होंडा शाईन एम. एच १२ एन. आर ६२२६ या मोटार सायकल वरुन जात असताना मोटारसायकलची धडक होवून झालेल अपघातात या दोघांच्या मृत्यु झाला . यासंद्सर्भातील तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर अभिजीत पवार करीत आहेत .