बीड (प्रतिनिधी)- संत भगवान बाबा जयंती उत्सव समिती पाटोदा यांच्या वतीने दिला जाणारा मानाचा संत भगवान बाबा जीवन गौरव पुरस्कार न्यूज 18 लोकमतचे बीड जिल्हा प्रतिनिधी सुरेश जाधव यांना प्रदान करण्यात आला यावेळी..जम्मू काश्मीरचे आयुक्त आय ए एस सागर डोईफोडे, महंत राधाताई सानप, भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर घुमरे माजी सभापती महेंद्र गरजे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

सामाजिक आध्यात्मिक आणि पत्रकारिता क्षेत्रांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून काम करणारे सुरेश जाधव यांच्या कामाची दखल घेऊन संत भगवान बाबा उत्सव समिती पाटोदा यांच्या वतीने मानाचा समजला जाणारा संत भगवान बाबा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती 

यावेळी पुरस्काराला उत्तर देताना सुरेश जाधव यांनी सांगितले की सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करताना संत भगवान बाबांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार हा आशीर्वाद आणि ऊर्जा देणारा पुरस्कार आहे. यामुळे काम करण्याची आणखी नवी उमेद मिळाली असे त्यांनी सांगीतले.