मागील काही दिवसांपासून पोलीस स्टेशन हदीमध्ये मालाविषयक गुन्याचे प्रमाण वाढल्याने तसंच जामगुंडी मंगलकार्यावरून जाणा-या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावुन जबरी चोरी झाल्याने त्यास अनुसरून पोलीस आयुक्त , पोलीस उपआयुक्त परिमंडळ सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी वेळोवेळी मिटींग घेऊन अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याकरता गुन्हे प्रकटीकरण पथकास सुचना दिलेल्या होत्या, त्यानुसार विजापुर नाका पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपी याचा कसोशीने शोध चालु होता.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

विजापुर नाका पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने जामगुंडी मंगलकार्यालय जवळील रोडवर झालेल्या जबरी बाबत पथकाने आरोपीतांचा शोध घेण्यास सुरवात केली संशयित आरोपीताच्या माग काढत काढत एकूण १८ सी.सी.टी.व्ही फुटेज चेक केले व अथक प्रयत्न करून सदर फुटेजचे विश्लेषण करून संशयित आरोपीताच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते, त्यादरम्यान गोपनीय बातमीदार मार्फतीने बातमी मिळाली की, जबरी चोरी करणारे दोन इसम जबरी चोरीतील दागिने विकण्यासाठी जुना विजापुर नाका, सोलापुर येथील सराफ लाईन मागत फिरत आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने व आमच्याकडील संशयित दोन आरोपीताचे वर्णन बातमीदार मागितलेल्या मिळतेजुळते निघाल्याने विजापुर नाका पोलीस स्टेशन कडील गुन्हे प्रकटीकरणातील स्टाफ विजापुर नाका हनुमान मंदीराजवळ सीतापुर येथे सापळा रचुन शिताफीने विधीसंघर्ष चालक नाव १) शिवप्रसाद तानाजी राठोड व १७ वर्ष, रा. भोजप्पा तांङा, कवठेगांव सोलापुर २) रोहीत विजय मदने वय १७ वर्षे, रा. मु.पो. कवठे ता. उत्तर सोलापुर जिल्हा सोलापुर असे असल्याचे सांगितले तसेच त्यांच्याकडे अधिक तपास करून गुन्ह्यातील गेला माल ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनीगंठण किंमत रुपये ३०,०००/- रूपये व गुन्हा करताना वापरलेले मोटार सायकल असा एकूण १,५५,०००/- रूपयाचा मुद्देमाल हस्तगत करून विजापुर नाका पो.स्टे. गु.र.नं. ३९५/२०२२ भा.दं.वि. कलम ३९२.३४ हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

तसेच दि. २२/०७/२०२२ रोजी इंदिरा नगर येथे कॉलेजला जाणा-या मुलाचा मोबाईल अज्ञात चोरट्याने स्कुटीवर येऊन चोरून नेला होता. त्याबाबत पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३६० / २०२२ मा. द.वि. कलम ३ अन्वये गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्याचे तपासामध्ये आरोपी नाव गंगाधर आण्णाराव बेडगे वय ३० वर्षे, रा. माशाळ वस्ती, विजापुर रोड, सोलापुर याच्याकडुन वरील गुन्ह्यातील गेलामाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपीकडुन गुन्ह्यात गेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली स्कूटी असा मिळुन ७६,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून सदरील गुन्हा उघडकीस आणाला आहे. सध्या आरोपी हे न्यायालयीन कोठडीत आहे.सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. राजेंद्र माने सो, मा. पोलीस उपायुक्त (परिमंडळ) डॉ. वैशाली कडुकर, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त माधव रेड्डी सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बाळकृष्ण हनपुङे पाटील सो. दुय्यम पोलीस निरीक्षक श्री. अजय जगताप सो यांचे मार्गदर्शना खाली पोसई/एस. एस. मुरकुटे, मोना/१२२४ रमेश गवळी, पोना/१४०४ गणेश शिर्के, पोशि/ ९१८ संतोष माने, पोशि/ ५७३२ राहुल विटकर, पोशि/१४५९ बोल्ली, पोशि/८५९ अमृत सुरवसे, पोशि/ अंबादास जाधव यांनी पार पाडली.