शिरुर दिनांक ( वार्ताहर ) - एमआयडीसी परिसरात कोयत्याचा धाक दाखवुन मोबाईल चोरी करणा-या सराईत आरोपीना पोलीसांनी अटक करुन 82,000/- रुपये किं.चे पाच मोबाईल व स्कुटी मोटार सायकल जप्त केली आहे . याप्रकरणी 1) इस्तेखार इंतेजार शेख वय 19 वर्षे, रा. चितळेरोड, दत्त बेकरी, ता. जि. अहमदनगर, (2) राजेश भगवान पाखरे वय 19 वर्षे, रा. गाईकेमळा, रेल्वे स्टेशन, ता. जि. अहमदनगर, (3) गुरप्रित श्रीपती घोडके वय 19 वर्षे, रा. नेमाणे ईस्टेट, केडगाव देवी रोडी, ता.जि. अहमदनगर यांना अटक करण्यात आली आहे . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितेनुसार रांजणगाव औ‌द्योगीक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगार असुन ते कंपनीमध्ये जातांना व येतांना त्यांना अडवुन कोयत्याचा धाक दाखवुन त्यांचे कडील मोबाईल चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढल्याने गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी एमआयडीसी परिसरात दररोज साध्या वेषात तसेच सरकारी वाहनातुन गणवेषामध्ये पेट्रोलींग सुरु केली व घडलेले गुन्हे उघडकिस आणण्यासाठी तपास पथकास सुचना दिलेल्या होत्या. दि.05 मार्च 2024 रोजी रांजणगाव येथुन गजानन सुखलाल राऊत हे पायी चालत जात असतांना त्यांना स्कुटी मोटार सायकल वरुन आलेल्या तीघांनी कोयत्याचा धाक दाखवत त्यांच्याकडील मोबाईल चोरी करुन नेला होता. तसेच दि.9 मार्च 2024 रोजी मोहम्मदहुसेन मंसुरी हे एमआयडीसी मधील पेप्सिको कंपनी समोरुन जात असतांना त्यांनाही स्कुटीवरील तीन अनोळखी इसमांनी रस्ता विचारण्याचा बहाणा करुन त्यांचेकडील मोबाईल, व रोख रक्कम चोरुन नेली होती. सदरचे गुन्हे उघडकिस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना दिलेल्या सुचनांप्रमाणे सी.सी.टि.व्हि. फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे अहमदनगर जिल्ह्यातील आरोपी 1) इस्तेखार इंतेजार शेख वय 19 वर्षे, रा. चितळेरोड, दत्त बेकरी, ता. जि. अहमदनर, (2) राजेश भगवान पाखरे वय 19 वर्षे, रा. गाईकेमळा, रेल्वे स्टेशन, ता. जि. अहमदनगर, (3) गुरप्रित श्रीपती घोडके वय 19 वर्षे, रा. नेमाणे ईस्टेट, केडगाव देवी रोडी, ता.जि. अहमदनगर यांना अटक करण्यात आली आहे. सदर आरोपींकडे तपास केला असता त्यांनी अशाच प्रकारे शिक्रापुर पो.स्टे. हद्दीत 01, कोतवाली पो.स्टे. हद्दीत 01 व रांजणगाव पो.स्टे. हद्दीत 02 असे एकुण 04 गुन्हे केल्याचे उघडकीस आले असुन त्यांच्याकडुन एकुण 82,000/रु. किंमतीचे पाच मोबाईल व गुन्हयात वापरलेली स्कुटी मोटार सायकल जप्त करण्यात आलेली आहे. पोलीस अधिक्षक पकंज देशमुख , अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरुर विक्रम ढोले यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहाय्यक फौ. दत्तात्रय शिंदे, पो.कॉ. विजय शिंदे, पो.कॉ. उमेश कुतवळ, पोलीस हवालदार विलास आंबेकर, .वैजनाथ नागरगोजे , तेजस रासकर यांनी केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे व पोलीस हवालदार तेजस रासकर, करत आहेत.