"मरावे परी नेत्ररुपी उरावे" या उक्तीप्रमाणे टिळक वार्ड हिंगणघाट येथील रहिवासी असलेल्या श्रीमती स्व.राधिकाबाई मधुकरराव ठाकरे  (वय 82) यांचे आज दिनांक 26-12-2023 ला वृद्धापकाळाने निधन झाले . यावेळी विविध सामाजिक संघटनांशी ऋणानुबंध जुळलेले तसेच सामाजिक, पर्यावरण, रक्तदान, नेत्रदान शिबीर  व वैद्यकीय मदत या विविधांगी क्षेत्रात अत्यंत अग्रेसर असणारे व स्वकृतीतुन समाजापुढे आदर्श ठेवणारे श्री जय भवानी माता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे  मार्गदर्शक व जेष्ठ सदस्य गुणवंतभाऊ ठाकरे व त्यांचे जेष्ठ बंधूद्वय जयंतभाऊ, अनंताभाऊ, व यशवंतभाऊ यांनी आपल्या आईच्या नेत्रदानाचा निर्णय घेतला. लागलीच सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या नेत्रविभागाची टिम येऊन त्यांनी नेत्रदानाचे सोपस्कर पार पाडले. ठाकरे परीवाराने घेतलेल्या या समाजोपयोगी व आदर्श निर्णयाबद्दल संस्थेच्या वतीने तसेच सर्व स्तरातून त्यांचे आभार मानण्यात आले व समाजात नेत्रदानाबाबत होत असलेल्या जागृतीबद्दल समाधान व्यक्त