शिरुर  - भेदाभेद नष्ट करुन एकमेकांशी बंधुभाव निर्माण करुन भारतीय म्हणून जगा असे आवाहन चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख डॉ . राजाभाउ भैलूमे यांनी केले .

शहरातील डॉ . बाबासाहेब आंबेडकर विचार मंच यांचा वतीने ' संविधान व युवापिढी ' या विषयावर ॲड . वैभव चौधरी यांचे व्याख्यान विद्याधाम प्रशालेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते . यावेळी बोरा महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ . राजाभाउ भैलूमे , विचार मंचचे प्रवीण गायकवाड , माजी नगरसेवक विनोद भालेराव , महात्मा फृले राहूरी कृषी विद्यापीठातील प्रा .दीपक गायकवाड , शिरुर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती नीलेश खाबिया , शिरुर तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक नितीन बारवकर , मुख्याध्यापक प्रकाश कल्याणकर आदी यावेळी उपस्थित होते . ॲड वैभव चौधरी यांनी भारतीय संविधान संदर्भातील विविध बाबी सांगून त्यासंदर्भातील सखोल माहिती दिली . प्रा भैलूमे म्हणाले की घटनेने आधिकार दिले आहेत तसे कर्तव्ये ही सांगितले आहेत .स्वातंत्र्या बरोबर जबाबदारीचे पालन करावे लागते . समाजातील दुजाभाव कमी करुन समतेने काम करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे .घटना जेवढी तुमचे सरंक्षण करते तेवढी जबाबदारी ही देते. तुम्ही जबाबदार झाल्याशिवाय स्वातंत्र्याची फळे मिळणार नाही . बदल हा संस्कारातून होतो . एकमेकांशी बंधुभाव निर्माण करुन जगा . भेदाभेद नष्ट करुन भारतीय म्हणून जगा असे आवाहन त्यांनी केले . काळानुरुप सामाजिक धारणा बदलाव्या लागतील . पारंपारिक दुष्टिकोन बदलावे लागतील .कणखर बना वदेशातील कायदे जाणून घ्या असे ही ते म्हणाले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण गायकवाड यांनी केले . त्यात त्यांनी विचार मंचच्या उपक्रमाची माहिती दिली .