बिडकिन येथील जिल्हा परिषद शाळा सादातनगर येथे शिक्षक दिन साजरा...
शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार...
बिडकिन प्रतिनिधी:-
पैठण तालुक्यातील बिडकिन येथील जिल्हा परिषद शाळा सादातनगर येथे आज शिक्षक दिनानिमित्त आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी शिक्षक दिनानिमित्त उपस्थित शिक्षकांना शुभेच्छा देत सत्कार करण्यात आला.शिक्षक दिनानिमित्त मुख्याध्यापक गौतम घेवंदे व सहशिक्षक नितीन घोलप तसेच महाराष्ट्र भुषण इंग्रजी शाळा येथील शिक्षक मुनाफ शेख सर यांचा शाल व श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश शिंदे, नामदेव शरणागत,बापु बारस्कर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष कृष्णा लोखंडे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य तथा पत्रकार रविंद्र गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र गायकवाड यांनी केले तर आभारप्रदर्शन मुख्याध्यापक घेवंदे सर यांनी मानले.
रविंद्र गायकवाड, बिडकिन