शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर नगरपरिषदेचे सेवानिवृत्त कार्यालयीन अधीक्षक सुभाष उर्फ हुकुमचंद शिंगवी वय ७० यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले . त्याच्या पश्चात पत्नी , तीन विवहित मुले , सूना नातवंडे असा परीवार आहे . शिंगवी हे शिरुर नगरपरिषदेतून कार्यालयीन अधीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते . व्यवसायिक राहूल शिंगवी ,राजेश शिंगवी व चेतन शिंगवी यांचे ते वडिल होत . शिंगवी यांची अंत्ययात्रा शनिवार दिनांक ६ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता हुडको कॉलनी ( छत्रपती संभाजी नगर ) येथून अमरधाम स्मशानभूमी शिरुर येथे जाईल .