गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर व जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची भेट  देऊन विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर व जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी सिरसदेवी चे सरपंच रवींद्र बप्पा गाडे यांच्या कामाचे केले कौतुक

गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील ग्रामपंचायत अंतर्गत झालेला विकास पाहण्यासाठी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी भेट दिली यावेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा , अजित पवार साहेब जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, वासुदेव सोळुंके अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, टिळेकर साहेब, उपविभागीय अधिकारी, वानखेडे साहेब, प्रकल्प संचालक जि प बीड, मोकाटे साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ सचिन सानप, तहसीलदार सचिन सानप यांच्या सह पोलीस स्टेशनचे तलवाडा आधीकारी उपस्थित होते उपस्थित विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर व जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी सिरसदेवी ग्रामपंचायत सरपंच रविंद्र बप्पा गाडे यांच्या कामाचे कौतुक केले ग्रामपंचायत इमारत बांधकाम, जि प शाळा, विरुगुळा कक्ष, स्मशानभूमी,प्युर ब्लॉक,वनराई झाडे , रोजगार हमीचे कामे, रस्ते,नाली, स्वच्छता, अंगणवाडी,बचतगट महीलाचा उद्योजग यासह विविध कामे पाहत गावाचे व सरपंच ग्रामसेवक यांचे कौतुक करून अभिनंदन केले पंचायत समिती अधिकारी,तलाठी ,

ग्रामसेवक , अंगणवाडी सेविका,बचतगट, उमेद अभियानांतर्गत कर्मचारी, तहसीलद कर्मचारी यासह गावकरी उपस्थित होते यावेळी सुनील केंद्रेकर साहेब यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना शाल व छत्री वाटप करण्यात आली, सरपंच रवींद्र बप्पा गाडे, ग्रामसेवक देवकर उप अभियंता नागरगोजे साहेब, अभियंता चोपडे साहेब, पंचायत समिती विस्ताराधिकारी महेंद्र गायकवाड, बि जी राठोड, उपस्थित होते