बीड (प्रतिनिधी) आज बीड येथे शासकीय विश्रामगृह याठिकाणी धनगर समाज महाराष्ट्र राज्य व बीड जिल्हा यांच्या वतीने मा.प्रकाश भैय्या सोनसळे अध्यक्ष धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली आज बैठक घेण्यात आली होती. बैठकीचे अध्यक्ष रवींद्रजी गाडेकर (माजी सरपंच घुमरा पारगाव) प्रमुख पाहुणे सुदर्शन दादा भोंडवे, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष उबाळे काका ,नारायण भोंडवे सरपंच डोंमरी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली.या बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना प्रकाश भैय्या सोनसळे यांनी सांगितले की समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी समाजाच्या अडीअडचणीसाठी धावून जाण्यासाठी समाजाच्या समस्या जाणून घेण्यासाठी युवकांनी व समाज बांधवांनी मला सहकार्य करावे मला साथ द्यावी समाजाच्या न्याय हक्कासाठी समाजाच्या हितासाठी अन्यायाच्या विरूद्ध लढण्यासाठी मी खंबीरपणे उभा आहे असे बोलताना सांगितले.यामध्ये चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला व समाजातील युवकांकडे काही जबाबदारी देण्यात आल्या.

यावेळी भारत गाडे,शितलताई मतकर जिल्हाध्यक्ष,अरुण काकडे ,अविनाश भरणे, बाजीराव शिंदे,दत्ता गाडेकर, संदिप गाडेकर, नवनाथ डफळ, ईश्वर भोंडवे,दादा जायभाये, नितीन निर्मळ, ओंकार काळे, गुरव सर,नितेश गांगुर्डे, अक्षय खोटे,यश भोसले, प्रशांत काकडे,करण भोंडवे, तांबे भैय्या ,आदी समाज बांधव उपस्थित होते.