अबंड तालुक्यातील अवैध वाळू वाहतूकसह उपसा बंद करण्यासाठी तहसीलदारानां निवेदन,

पाचोड(विजय चिडे) जालन्यातील अंबड तालुक्यासह घनसावंगी तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून गेल्या अनेक दिवसापासून हायवा ट्रकद्वारे वाहतुक केली जात आहे. ही अवैध वाळू वाहतूकसह उपसा बंद करण्याच्या मागणी साठी अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना एम आय एमचे जिल्हाउपाध्यक्ष निसार पटेल यांनी दिले आहे.

या निवेदनात असे म्हटले की, अंबड तालुक्यातील बळेगांव, आपेगांव, डोमलगांव, साष्टपिंपळगांव, शहागड, गोरी, गंधारी, वाळकेश्वर, पाथरवाला, गोंदी व तसेच घनसावंगी तालुक्यातील गोदावरी नदीच्या लगत गावातील ट्रॅक्टर व केनीच्या सहाय्याने गोदावरी पात्रातून वाळु काढून वरील गावातील शिवारा मध्ये वाळु स्टॉक केली जाते व रात्री हायवा ट्रकने विक्रीसाठी वाळु औरंगाबाद, जालना, बीड व इतर ठिकाणी रात्री विना नंबरच्या शंभर ते 200 हायवा ट्रक द्वारे अतिवेगाने वाहतुक केली जाते. व शासनाचे कोट्यावधी रुपयाचे महसुल बुडविले जाते.

 वाळु चोरटी वाहतुक करणारे गुंड प्रवृत्तीचे लोक असून त्याच्या विरोधात कोणीही सहजा सहजी तक्रार करत नाही. जर कोणी तक्रार केली तर प्राणघातक हल्ला केला जातो. मागील काळात अंबड तहसिलदार सह इतर अधिकाऱ्यावर हल्ला झालेला आहे. व तालुक्यातील तक्रारदारासह पत्रकारावर पण प्रशासकीय अधिकारी यांच्यावर अशाच प्रकारे हल्ले करण्यात आले होते. म्हणुन संबंधीतांनी वाळु माफीयांची गुन्हेगारी पार्श्वभुमी पाहाता त्यांचे रेकॉर्ड तपासून जालना जिल्हयातून हदद पार करण्यात यावे.

मला पोलीस संरक्षण देण्यात यावे. माझ्यावर गुंडा मार्फत हल्ला झाल्यास किंवा माझे जिवाचे बरेवाईट झाल्यास अंबड तालुक्यातील वाळु माफीयांना जबाबदार धरण्यात येईल. विना क्रमांकाच्या वाहनाने भरलेले हायवा ट्रक अतिवेगाने धावत असतात त्यामुळे अनेक अपघात झाले व अनेक लोकांना प्राणाला मुकावे लागले. व तसेच मराठवाडयात दुष्काळ पडत असून गोदापात्रातून वाळुचा उपसा झाल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. व पर्यावरणाची हानी सुध्दा होत आहे.

संबंधीतांवर योग्य कार्यवाही न केल्यास मला नाविलाजास्तव रस्तारोको अथवा विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे आमरण उपोषण करावे लागेल याची संबंधीतांनी दखल घ्यावी पूर्ण वेळ पथक नेमण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.