शिरूर  : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलनास बसलेले शिरूर मधील मराठा समाज व मुस्लीम समाजातील युवकांनी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्याने रात्री अन्नत्याग उपोषण आंदोलन सरबत घेवून सोडले. मागील तीन दिवसापासून शिरूर नगरपरीषद मंगल कार्यालया जवळ समस्त सकल मराठा समाज संघ घोडनदीचे विश्वस्त सागर नरवडे, अविनाश जाधव व मुस्लीम समाजाचे कलीम सय्यद व राहील शेख हे अन्नत्याग आंदोलनास बसले होते. आज रात्री (गुरुवार दिनांक २ नोव्हेंबर ) सराटी येथे उपोषणास बसलेले मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्याचे वृत्त आल्यानंतर शिरूर मध्ये उपोषणास बसलेल्या या कार्यकर्त्यांनीही छोट्या मुलीच्या हस्ते सरबत घेवून उपोषण सोडले. यावेळी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, पोलीस निरीक्षक संजय जगताप व आंदोलनकर्त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी उपोषण कर्ते यांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्याने आम्ही ही अन्नत्याग आंदोलन मागे घेत आहे. यापुढील काळात ही आरक्षणाचा प्रश्नासंदर्भात मनोज जरांगे हे ज्याप्रमाणे सूचना देतील त्याप्रमाणे आंदोलन करण्यात येईल. यावेळी शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड . सुभाष पवार यांनी मराठा आरक्षण संदर्भातील आंदोलनाचा आढावा घेत शासनाने लवकरात लवकर  आरक्षण जाहीर करावे अशी मागणी केली.

शिवसेनेचे माजी शहरप्रमुख सुनील जाधव, माजी नगरसेवक विनोद भालेराव, शिक्षण मंडळाचे माजी सभापती तुकाराम खोले, संतोष शितोळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते हाफीज बागवान,नोटरी रवींद्र खांडरे, मनसेच्या जनहित कक्षांचे जिल्हाध्यक्ष सुशांत कुटे, मनसेचे माजी शहरप्रमुख अविनाश घोगरे, रवींद्र गुळांदे , मराठा समाज संघ घोडनदीचे विश्वस्त रुपेश घाडगे, नीलेश नवले, माजी नगरसेवक मंगेश खांडरे, ॲड .सतीश गवारी, ॲड .विक्रम पाचंगे , संजय बांडे, संघपती भरत चोरडिया,मनसे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद, प्रवाशी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, सामाजिक कार्यकर्ते किरण बनकर, ,स्वप्नील रेड्डी, महेंद्र येवले,, रुद्र राखुंडे, सिध्दार्थ चव्हाण, संपत दसगुडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी नीलेश पवार, अमोल चव्हाण, शेखर दळवी, , मुश्ताकभाई शेख,एजाज बागवान, अजित डोंगरे, मितेश गादिया, विजय नरके,हर्षद ओस्तवाल, सुशील सुर्वे आदी उपस्थित यावेळी  होते.