शिरुर दि .( वार्ताहर ) डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडीयम स्कूल शिरूर येथे पर्यावरण पूरक गणेशमूर्ती बनविण्याची कार्य शाळा आयोजित करण्यात आली होती.        विद्यार्थ्यांनी स्वतः शाडूच्या माती पासून सुबक गणेशमूर्ती तयार केल्या. कोणताही रासायनिक घटक अथवा रंग न वापरता तयार केलेल्या या मूर्तींची स्थापना सर्व विद्यार्थी आपल्या घरी करणार आहेत. शाळेतील शिक्षक अमोल  वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना मूर्ती बनविण्यासाठी मार्गदर्शन केले.प्राचार्य डॉ . समीर ओंकार , रत्नमाला महाजन,  शिवानी पिंगळे,  सखाराम पुरी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले .