पाचोडमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे जंगी स्वागत.

पाचोड(विजय चिडे) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे गत दोन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दौऱ्यावर होते. याच दरम्यान गुरुवारी (दि.१७) रोजी छत्रपती संभाजीनगर वरून बीड येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असताना पाचोड ता.पैठण येथे त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पवार यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. तर, शरद पवार पाचोडमध्ये दाखल होताच कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचा बुलंद आवाज़ शरद पवार.... शरद पवार... अशा घोषणा देण्यात आल्या. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,

आमदार रोहीत पवार,आमदार राजेश टोपे,आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी आणि सेल्फी घेण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली. कार्यकर्त्यांची गर्दीमुळे पवारांची गाडी निघणे देखील अवघड झाले होते. त्यामुळे शेवटी पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजूला करत पवारांचा ताफा जाण्यासाठी रस्ता करून दिला. यावेळी पैठणचे माजी आमदार संजय वाघचौरे, महावि.चे ॲड. बद्रीनारायण भुमरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे ता.अध्यक्ष डॉ.गुलदाद पठाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकार्यध्यक्ष विलास शेळके,प्रभाकर भुमरे, धनराज भुमरे,पवन गटकाळ,अनिस पटेल,कौसर पटेल, युवराज चावरे,सागर नलावडे,जमीर पटेल आदी जणं उपस्थित होते.