सत्तावीस वर्षांपूर्वी रेव्ह.फादर रुडॉल्फ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेली पतसंस्थेच्या रूपाने लावलेले छोट्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे असे प्रतिपादन मुरूड तालुक्यातील कोर्लई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या २७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माउंट कार्मेल चर्चचे धर्मगुरू फादर बोनाव्हेंचर लुणीस केले.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष मार्सेलीन रुझार,

व्हाईस चेअरम फ्रान्सिस डिसोझा,सचिव सिमोन वेगस,यांच्यासाहित संचालकीय मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

     यावेळी फादर बोनाव्हेंचर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की,सत्तावीस वर्षांपूवी एका छोट्याशा खोलीत सुरू झालेली पतसंस्था ही भव्यदिव्य इमारतीमध्ये आली आहे.पैश्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वासावर पैसा ठेवा हे ब्रीद वाक्य जोपासत कोर्लई पतसंस्थेने आपल्या विविध नाविन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून एक सक्षम आर्थिक स्थैर्य दिले आहे.संस्थेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या कामगिरीचा उल्लेख केला आणि कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संस्थेची वाटचाल ही गोरगरिबांना साथ देणारी राहिल, अशी ग्वाही दिली.शासकीय नियमांचे तंतोतंत पालन करीत पतसंस्था ही ग्राहकांना सेवा देत आहे.तज्ञाचे मार्गदर्शनाखाली पतसंस्थेचे कामकाज सुरू आहेत.या संस्थेने कर्जावरील व्याज हे उद्दिष्ट न ठेवता लोकांना संस्थेमुळे कशाप्रकारे फायदा होईल यासाठी प्रयत्न केले.आहे.

   यावेळी संस्थेचे अध्यक्ष मार्सेलीन रुझार यांनी सांगितले की,कोलई ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्थेने आजपर्यंत २७वर्षाची व्यवसायाची कटिबध्दता राखत सहकारातील कार्याची अखंडता कायम राखली आहे.आजमितीस संस्थेचे २४६७सभासद आहेत.संस्थेचे वसुली भागभांडवल हे ५१लाख ७हजार४७५एवढे असून राखीव निधी ९१.४५ लाख इतके आहे.संस्थेच्या ठेवी ४कोटी३५लाख ७३हजार ४३१ आणि पैसे ३४ आहेत तर ३ कोटी३ लाख ६७हजार १५५ इतके असून त्यापैकी एक कोटी ३९ लाख ८७हजार ८९३ इतके वसूल झाले आहे. आर्थिक क्षेत्रात कमालीची स्पर्धात्मक परिस्थिती असूनही स्थापनेपासूनची ऑडीट वर्ग “ब” ची परंपरा कायम राखली आहे. बँकिंग क्षेत्रातील सध्याची आव्हाने व ग्राहकांच्या गरजा लक्षात घेता बँकाप्रमाणेच वेगवेगळया सेवा संस्थेने ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. संस्थेचे एका विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे आणि संस्था पाच कोटी ठेवींकडे वाटचाल करत आहे आणि यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षीत आहे.मार्च २०२२ अखेर संस्थेला पाच लाख वीस हजार दोनशे आणि ४७पैसे नफा झाला आहे. संस्थेला सतत प्रगतीपथावर ठेवण्यास प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हातभार लगला आहे या सर्व सभासद ग्राहकांचे व सर्व कर्मचा-यांचे त्यांनी आभार मानले.

यावेळी संस्थेच्या २०२२-२३ते२०२६-२७ या काळकरिता निवडून आलेले संचालक मंडळ यांचा संस्थेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.

 सभेचे सर्व विषय अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात मंजर करण्यात आले. अहवाल वाचन व्यवस्थापक लॉरेन्स वेगस यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे व्हाईस चेअरम फ्रान्सिस डिसोझा यांनी केले.