शिरुर दिनांक ( वार्ताहर ) इलेक्ट्रीक मोटारीची वायडींग केलेल्या कामाचे राहीलेले पैसे मागण्यासाठी गेले असता पैसे मागणारा व्यक्तीस मारहाण करण्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी दोन जणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . यासंदर्भात शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानदेव रामभाउ निचीत, वय 33 वर्षे, धंदा शेती, रा. वडनेर खुर्द ता. शिरूर जि. पुणे यांनी फिर्याद दिली आहे . २ ऑगस्ट 2023 रोजी सकाळी साडे नउ चे सुमारास वडनेर खुर्द येथे विक्रम बाळु निचीत, व शांताबाई बाळु निचीत, रा. वडनेर खुर्द ता. शिरूर, जि. पुणे यांचे घराजवळ इलेक्ट्रीक मोटारीची वायडींग केलेल्या कामाचे राहीलेले पैसे मागण्यासाठी ज्ञानदेव निचित गेले होते . त्यावेळी ते विक्रम याना म्हणाले की माझा नंबर ब्लॉक लिस्टला टाकला आहे, तु माझे कामाचे पैसे देवुन टाक, मी पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही, नंतर मी तुझे घराकडे परत येणार नाही असे बोलले असता शांताबाई बाळु निचीत यांनी ज्ञानदेव यांनी शिवीगाळ व दमदाटी केली व विक्रम बाळु निचीत याने शिवीगाळ, दमदाटी करून लोखंडी रॉडने डावे पायाचे अंगठ्याजवळ, डावे हाताचे कोपराजवळ, तळहाताला मारून फॅक्चर केले अशी तक्रार केली आहे . यासंदर्भातील आधीक तपास पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर करीत आहेत .