शिरुर दिनांक ( वार्ताहर ) येथील प्रसिध्द फिजोओथेरीपिस्ट डॉ. ऋचा लगड ( गोंगले ) यांना अविष्कार सोशल ॲन्ड एज्युकेशनल फाउंडैशन कोल्हापूर यांच्या वतीने आरोग्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विशेष पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले . सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना आविष्कार फौडेशनच्या वतीने डॉक्टर्स डे च्या निमित्ताने राज्यस्तरीय धन्वंतरी गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले . कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजीनगरचे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक अजित पाटील उपस्थित होते. कार्यक्रमासाठी ओमान येथील इलेक्ट्रीकल इंजिनिअर अश्फाक मुजावर, कोल्हापुरातील ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. सुनिल पाटील, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. किसनराव कुराडे, शाहू स्मारक भवनचे प्रशासन अधिकारी श्री. राजदीप सुर्वे आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष संजय पवार यांनी केले. २००७ पासून ते आजपर्यंतच्या कार्याचा आढावा त्यांनी घेतला. कोल्हापुर ते दुबई असा जगभरातील भविष्यात होणारा प्रवास मांडला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे अजित पाटील यांनी डॉक्टरांनी आपली प्रतिमा मलीन होऊ नये यासाठी जागृतपणे काम करून सेवेचा दर्जा वाढवावा अशी अपेक्षा केली. यावेळी पुरस्कार निवड समितीच्या श्री. मिलिंद देसाई, श्री. शशिकांत म्हेत्तर, श्री. मकबूल सय्यद, श्री विजय पाटील, श्री. वसंत अर्दाळकर, श्री. ताज मुल्लाणी यांचा प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. रविंद्रकुमार ताटे, डॉ देवेंद्र रासकर, डॉ महेंद्र कानडे, डॉ. स्नेहल मिठारी, डॉ. विलासराव देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पत्रकार ताज मुल्लाणी यांनी केले. या कार्यक्रमात प्रा. किसनराव कुराडे यांचे चिंगीची भरारी हे पुस्तक सर्व गौरवमुर्ती आणि प्रमुख अतिथी यांना भेट देण्यात आले. कार्यक्रमापूर्वी श्री. वसंत अर्दाळकर, श्री. ताज मुल्लाणी, प्रा. शितोळे सर यांनी आपल्या मधुर आवाजातून विविध गाणी म्हणून रसिकांना मंत्रमुग्ध केले. डॉ .ऋचा लगड या येथील विविध आरोग्य विषयक जाणिव जागृतीपर व सामाजिक कार्यात अग्रेसर असतात . दरम्यान डॉ ऋचा लगड ( गोंगले ) यांच्या पुरस्कार मिळाल्याबद्दल अविष्कार सोशल ॲन्ड एज्युकेशन फाउंडैशन कोल्हापूरचे सचिव प्रा. विलास बापूराव आंबेकर यांनी विशेष अभिनंदन केले .