शिरुर दिनांक ( वार्ताहर ) येथील सामाजिक कार्यकर्त्या भाग्यश्री राजेश शिंगवी यांनी आपल्या वाढदिवस देशी झाडांचे वृक्षारोपन करुन साजरा केला .      भाग्यश्री शिंगवी या  सामाजिक कार्यात सातत्याने कार्यरत असणा-या कार्यकर्त्या असून परिसरातील सामाजिक व धार्मिक कार्यात सहभागी असतात. शिंगवी यांनी  वाढदिवसानिमित्त शहरातील सह्याद्री देवराई शिरुर च्या वतीने  पुणे नगर रस्त्यावरील हॉटेल अंबिका शेजारील डोंगरावर लावण्यात येत आहे त्या परिसरातील  डोंगरावर वाढदिवसानिमित्त भाग्यश्री शिंगवी,राजेश शिंगवी , व मित शिंगवी यांनी वृक्षारोपन केले . भाग्यश्री शिंगवी यांनी वृक्षारोपन व संवर्धनाची चळवळ आधिक व्यापक करण्याचा दृष्टीने प्रयत्न करण्यात येईल अशी ग्वाही दिली .

फोटो ओळी 

सह्याद्री देवराई शिरुर येथे वृक्षारोपन करताना भाग्यश्री शिंगवी