शिरुर दिनांक ( वार्ताहर )आर एम डी. सिंहगड मॅनेजमेंट स्कूल कोंढापुरी यांनी क्लासिक इंडस्ट्रीज अँड एक्स्पोर्ट लिमिटेड रांजणगाव येथे इंडस्ट्रियल व्हिजिट दिली सीनियर एच आर एक्झिक्युटिव्ह श्री नवदीप कागदकर यांनी विद्यार्थ्यांना एच आर च्या कामाचे स्वरूप तसेच सेल्स फायनान्स मार्केटिंग डिपार्टमेंटचे कसे कामकाज चालते याबद्दल माहिती दिली आणिकंपनीमध्ये प्रत्यक्षात ट्यूब कशा पद्धतीने बनवले जाते याची याचे प्रात्यक्षिक  हरीश आचार्य प्रोडक्शन मॅनेजर यांनी दाखवले. प्लांट हेड  एस .एन . दिलिप  यांनी भविष्यातही आर एम डी सिंहगड मॅनेजमेंट स्कूल कोंढापुरी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले.   ग्रुप हेड एच आर इंडस्ट्रियल रिलेशन  सुर्यकांत शुक्ला  यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  प्रवीण चंदनकर यांनी  विद्यार्थ्यांना कंपनीची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी बद्दलच्या कामाबद्दल माहिती दिली इंडस्ट्रियल व्हिजीटच्या प्रस्तावनेबद्दल डॉ. सुनील  उजागरे यांनी माहिती दिली  डॉ. चारुलत्ता  कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.