शिरुर दिनांक (वार्ताहर ) जांबुत ता शिरुर येथे शेततळ्यात पडून बापलेकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सत्यवान शिवाजी गाजरे वय २५ व राजवंश सत्यवान गाजरे वय दीड वर्ष दोघे ही राहणार - जांबूत ता शिरुर जि पुणे असे या दुर्घटनेत मरण पावलेल्यांची नावे आहेत . दरम्यान पती सत्यवान यांना वाचवण्यासाठी उडी मारलेल्या स्नेहल गाजरे यांना वाचविण्यात यश आले आहे. याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे जांबूत ( पंचतळे ) येथील बेल्हा - जेजूरी राज्यमार्गालगत शिवाजी गाजरे यांच्या मालकीचे चारंगबाबा कृषी पर्यटन केंद्र आहे.या ठिकाणी कुटूंबासह ते रहातात. रविवारी ( दि.३० ) संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास सत्यवान शिवाजी गाजरे ( वय २५ वर्षे ),पत्नी स्नेहल व त्याच्या मुलगा राजवंश या दीड वर्षे वयाच्या लहान मुलासह शेतात होते. त्यांची नजरचुकवत खेळताना राजवंश हा तळ्यात पडला असता वडील सत्यवान शिवाजी गाजरे याने राजवंशला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र त्यांना पोहता येत नसल्याने तेदेखील बुडू लागले असता सत्यवान यांची पत्नी स्नेहल हिने पती व मुलाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र तीही पाण्यात बुडू लागल्याने तिच्या ओरडण्याच्या आवाजाने इतरांनी घटनास्थळी धाव घेत बुडत असलेल्या स्नेहल हिला बाहेर काढले.तसेच राजवंश व सत्यवान यांनाही बाहेर काढुन उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तपासून उपचारापूर्वीच सत्यवान व राजवंश या दोघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले. याबाबत ऋषिकेष दिगंबर झिंजाड यांनी पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे (फोटो- सत्यवान गाजरे राजवंश गाजरे