तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय हिंगोली येथे महामानव भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी. 

राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती दि. १४ एप्रिल शुक्रवार रोजी संपुर्ण भारतभर साजरी केली जात असुन  

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय हिंगोली येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ नामदेव कोरडे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवांदन करून जयंती साजरी करण्यात आली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरीत्र्यावर उपस्थितांना माहिती देण्यात आली यावेळी डॉ. नामदेव कोरडे तालुका आरोग्य अधिकारी हिंगोली, डॉ. अजहर देशमुख, वैद्यकीय अधिकारी प्रकाश बर्वे, आरोग्य सहाय्यक शैलेश मुंदडा, तालुका लेखापाल रवींद्र भालेराव, कुष्ठरोग तंत्रज्ञ पंजाब गायकवाड, सिकलसेल सहायक मारुती सोलापूरे, आशा समन्वयक गणेश ठोके, हे उपस्थित होते.