शिरुर दिनांक ( वार्ताहर ) यशवंत कॉलनी येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका शैलजा ज्ञानेश्वर खोसे वय ८३ यांचे वृध्दापकाळाने निधन झाले .त्याच्या पश्चात पती , दोन मुले , १ विवाहित मुलगी , सूना, नातवंडे असा परीवार आहे . जिल्हा सत्र न्यायाधीश नितिन खोसे आणि व्यवसायिक शैलेश खोसे यांच्या त्या मातोश्री होत .तर सुनील शिंदे यांच्या सासु होत . शेतकी खात्यातील सेवानिवृत्त आधिकारी ज्ञानेशवर खोसे यांच्या त्या पत्नी होत . खोसे या शिरुर येथील न्यू इंग्लिश स्कुल मधुन मुख्याध्यापिका म्हणुन सेवानिवृत्त झाल्या होत्या. विद्यार्थीप्रिय शिक्षीका अशी त्यांची ओळख होती .