मालेगाव शहरातील संत गजानन महाराज विद्यामंदिरात ग्रीन डे ता 23 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला .यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यामंदिराचे व्यवस्थापक कपिल भालेराव होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी कपील भालेराव म्हणाले की, पर्यावरनाचे संरक्षण केले पाहिजे ,वृक्ष संवर्धन वृक्ष संगोपन केले पाहिजे प्लास्टिक च्या वापर टाळला पाहिजे वृक्षतोड थांबविली पाहिजे झाडांमुळे ऑक्सिजन मिळतो पर्जन्य वृष्टी होते त्यामुळे सर्वानी पर्यावरणाचे संरक्षण केले पाहिजे असे ते म्हणाले यावेळी विद्यामंदिराचे मुख्याध्यापक पद्माकर लहाने ,व्यवस्थापक कपील भालेराव ,शिक्षिका सौ भाग्यश्री तिवारी सौ प्रणिता पखाले ,सौ पूनम कुटे ,सौ प्रणिता पखाले ,सौ सुलोचना गिर्हे ,सौ मनीषा साबळे ,सौ रंजना कांबळे ,सौ प्रज्ञा मोहळे ,शुभांगी गुडदे ,सौ राधा काळे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन सौ पूनम कुटे यांनी तर आभार प्रदर्शन सौ सुलोचना गिर्हे यांनी केले.