सिध्देश्वर मठपती-

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

   धर्माबाद प्रतिनिधी

धर्माबाद ऍग्रो शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड यांच्यातर्फे हनुमान जन्मोत्सवानिमित्त श्रीक्षेत्र हनुमान मंदिर वाडी येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आला. शिबिरामध्ये हनुमान जन्मोत्सवानिमित्त अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येत होते.

 सकाळी नऊ वाजल्यापासून या शिबिराला सुरुवात झाली होती. हनुमंत रायाचे महाआरती करून शिबिराला सुरुवात करण्यात आली या शिबिरामध्ये नांदेड येथील गोवळकर गुरुजी ब्लड बँक व ब्लड बँकेचे सर्व कर्मचारी वर्ग उपस्थितीत होते.

महारक्तदान शिबिर यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी धर्माबाद येथील ऍग्रो शेतकरी

उत्पादक कंपनीचे संचालक माधव कदम व सर्व मित्र मंडळ व ऍग्रो शेतकरी उत्पादक कंपनी चे सचिव प्रवीण गायकवाड, आदर्श शेतकरी बचत गट अध्यक्ष अविनाश पिंगळे, JSR आयुर्वेदिक मसाज सेंटर चे सतीश मोकमपल्ले ,साईनाथ उरेकर,माणिक जेरमोड, नितीन सूर्यवंशी, व सर्व मित्रपरिवार उपस्थित होते .

महारुक्तदान शिबिरामध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत एकूण रक्तदाते 27 जणांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र भगवान, व श्री.हनुमान जन्मोत्सव प्रकट दिनी साजरी केली यावेळी सुदर्शन गुजरवाड, व धर्माबाद ऍग्रो शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष संजय जैरमोड व सर्व मित्र परिवार यांचे सहकार्य लाभले. शिबिरास हनुमंत भक्त यांचा प्रतिसाद मिळाला.

श्री.गोळवणकर गुरुजी ब्लड बँक नांदेड चे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

यांनी पुढाकार घेऊन यशस्वीरीता रक्तदान संपन्न केले. धर्माबाद ऍग्रो शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड यांच्यातर्फे आयोजित केलेल्या महारक्तदान पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता या मध्ये 27 महारक्तदात्यांनी सहभाग घेतला होता. आयोजकांचे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे अशी माहिती JSR आयुर्वेद मसाज सेंटरचे मालक सतीश मोकमपल्ले समराळेकर यांच्याकडून माहिती मिळाली.